ETV Bharat / bharat

Bihar Assembly Elections LIVE : तिसर्‍या टप्प्यातील मतदान समाप्त; 56.12% मतदानाची नोंद

author img

By

Published : Nov 7, 2020, 7:07 AM IST

Updated : Nov 7, 2020, 6:58 PM IST

Bihar Assembly Elections third phase of voting LIVE Updates
Bihar Assembly Elections : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात..

18:48 November 07

17:42 November 07

बिहारमध्ये 5 वाजेपर्यंत 54.06% मतदान

15:52 November 07

तीन वाजेपर्यंत 45.85% टक्के मतदान...

13:34 November 07

दुपारपर्यंत ३४.८२ टक्के मतदान..

बिहारमध्ये दुपारी एक वाजेपर्यंत एकूण ३४.८२ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.

13:13 November 07

पूर्णियामध्ये गोळीबार..

पूर्णियाच्या धमदाहा विधानसभा मतदारसंघात बूथ क्रमांक 280 वर गोळीबार आणि लाठीचार्ज झाला.

11:48 November 07

तीन तासांमध्ये १९.७४ टक्के मतदान

सकाळी ११ वाजेपर्यंत बिहारमध्ये एकूण १९.७४ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.

09:30 November 07

दरभंगामध्ये पोलिंग एजंटचा मृत्यू

दरभंगाच्या बरहद गावामध्ये मतदान केंद्र क्रमांक १९०वर पोलिंग एजंटचा मृत्यू झाला. यामुळे मतदान केंद्रावर काही वेळ खळबळ माजली होती. दरभंगा गावात सकाळी आठ वाजेपर्यंत ३ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.

08:01 November 07

एका तासात ३.९ टक्के मतदान..

बिहारमध्ये सकाळी आठ वाजेपर्यंत एकूण ३.९ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.

07:47 November 07

पूर्णियामध्ये दोन ठिकाणी ईव्हीएम खराब; मतदानास विलंब

पूर्णियाच्या धमदाहा विधानसभा क्षेत्रातील दोन मतदान केंद्रांवरील ईव्हीएम मशीन खराब असल्यामुळे तेथे मतदान सुरू होऊ शकले नाही.

07:22 November 07

मतदानासाठी मोदींचे आवाहन..

"बिहार विधानसभा निवडणुकीसाठी आज तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. सर्व लोकांना माझी विनंती आहे, की त्यांनी मोठ्या संख्येने लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी होत मतदानाचा नवा विक्रम बनवावा. तसेच, यावेळी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे आणि मास्कचा वापर करणेही विसरु नका" अशा आशयाचे ट्विट करत पंतप्रधानांनी जनतेला मतदानाचे आवाहन केले आहे.

07:13 November 07

शिवसेनेचे हे उमेदवार आज रिंगणात..

तिसऱ्या टप्प्यामध्ये शिवसेनेच्या ११ उमेदवारांचे भवितव्य आज मतपेट्यांमध्ये बंद होणार आहे. हे उमेदवार पुढीलप्रमाणे..

  • प्रदीप कुमार सिंह - औराई
  • शत्रूघन पासवान - कल्याणपुर
  • सुभाषचंद्र पासवान - बनमंखी
  • नवीन कुमार मल्लीक - ठाकूरगंज
  • नंद कुमार - समस्तीपुर
  • पुष्पांकुमारी - सराय रंजन
  • मनीष कुमार - मोरवा
  • शिवनाथ मल्लीक - किशनगंज
  • चंदन कु. यादव - बहादुरगंज
  • गुंजा देवी - नरपरगंज
  • नागेंद्र चंद्र मंडल - मनिहारी

07:05 November 07

मतदानाला सुरूवात..

तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सकाळी सात वाजेपासून सुरुवात झाली आहे.

07:04 November 07

Bihar Assembly Elections : तिसर्‍या टप्प्यातील मतदान समाप्त; 56.12% मतदानाची नोंद

पाटणा - बिहार विधानसभेच्या ७८ जागांसाठी आज मतदान होत आहे. हा निवडणुकीचा तिसरा आणि शेवटचा टप्पा आहे. आज १५ जिल्ह्यातील ७८ मतदारसंघात मतदान होणार आहे. यातील चार मतदारसंघात सकाळी ७ वाजेपासून सायंकाळी ४ पर्यंतच मतदान होणार आहे. निवडणुकीच्या या टप्प्यात १ हजार २०४ उमेदवार रिंगणात आहेत.

Last Updated : Nov 7, 2020, 6:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.