ETV Bharat / bharat

बिहार विधानसभा निवडणूक : दुसऱ्या टप्प्यात ५३.५१ टक्के मतदानाची नोंद

author img

By

Published : Nov 3, 2020, 6:40 AM IST

Updated : Nov 3, 2020, 7:02 PM IST

Bihar Assembly Elections second phase live updates
बिहार विधानसभा निवडणूक LIVE

18:59 November 03

बिहारमध्ये ५३.५१ टक्के मतदान..

पाटणा : बिहारच्या विधानसभा निवडणुकीचा दुसरा टप्पा आज पार पडला. यामध्ये ९४ जागांवर सुमारे १,५०० उमेदवारांचे भवितव्य मतपेट्यांमध्ये बंद झाले आहे. आज एकूण ५३.५१ टक्के मतदानाची नोंद झाली.

18:19 November 03

बिहारमधील दुसऱ्या टप्प्यातील मतदान पूर्ण..

बिहारमध्ये आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले. सायंकाळी पाच वाजेपर्यंत राज्यात ५१.८० टक्के मतदानाची नोंद झाली होती.

17:06 November 03

मुझफ्फरपूरमध्ये तीन जागांवरील मतदान पूर्ण

मुझफ्फरपूरमधील पारू, साहेबगंज आणि मीनापूर याठिकाणी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

15:37 November 03

दुपारी तीनपर्यंत ४४ टक्के मतदान..

बिहारमध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत एकूण ४४.५१ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.

12:09 November 03

लव सिन्हाला बहुमत मिळेल; शत्रुघ्न सिन्हांनी व्यक्त केला विश्वास

बॉलिवूड अभिनेते शत्रुघ्न सिन्हांचे पुत्र लव सिन्हा हे पाटणाच्या बांकीपूरमधील काँग्रेस उमेदवार आहेत. सध्या लोकांना बदल हवा आहे, त्यामुळे लवला नक्कीच बहुमत मिळेल असा विश्वास शत्रुघ्न यांनी व्यक्त केला.

12:07 November 03

जदयू नेते चंद्रिका राय यांनी छपरामध्ये केले मतदान..

जदयू नेते, आणि राजदच्या तेज प्रताप यादवांचे सासरे चंद्रिका राय यांनी छपरामध्ये मतदान केले. ते पारसा मतदारसंघातून उभे आहेत.

12:01 November 03

रवीशंकर प्रसाद यांनी केले मतदान..

केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते रवी शंकर प्रसाद यांनी पाटण्यामध्ये मतदान केले.

11:47 November 03

आतापर्यंत १९.२६ टक्के मतदान

सकाळी अकरा वाजेपर्यंत बिहारमध्ये एकूण १९.२६ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.

11:18 November 03

नालंदामध्ये ईव्हीएम बिघाड; मतदारांनी घातला गोंधळ

नालंदाच्या राजगीरमध्ये ईव्हीएम मशीनमध्य बिघाड झाल्याचे समोर आले. त्यानंतर मतदानासाठी जमलेल्या लोकांनी गोंधळ घातला.

09:51 November 03

मुख्यमंत्र्यांनी केले मतदान

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दिघामध्ये मतदान केले.

09:40 November 03

दोन तासांमध्ये ८.०२ टक्के मतदानाची नोंद..

सकाळी नऊ वाजेपर्यंत बिहारमध्ये एकूण ८.०२ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.

09:14 November 03

तेजस्वी यादव आणि राबडी देवींनी बजावला मतदानाचा हक्क!

बिहारच्या मुख्यमंत्री पदाचे उमेदवार तेजस्वी यादव यांनी आई राबडी देवींसह मतदानाचा हक्क बजावला आहे. पाटण्यातील मतदान केंद्र क्रमांक १६० वर त्यांनी मतदान केले. 

08:05 November 03

पहिल्या तासात ३.७ टक्के मतदान..

बिहारमध्ये सकाळी आठ वाजेपर्यंत ३.७ टक्के मतदान पार पडले आहे.

08:00 November 03

आजीला सायकलवर डबलसीट घेऊन नात पोहोचली मतदानाला

पाटणामधील एका मतदान केंद्रावर एक मुलगी आपल्या आजीला घेऊन मतदानास पोहोचली. विशेष म्हणजे ती आपल्या आजीला सायकलवर डबलसीट घेऊन मतदान करण्यासाठी आली होती. आपण पहिल्यांदाच मतदान करत असल्याचे या मुलीने सांगितले.

07:42 November 03

आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी जदयूच्या उमेदवाराला अटक..

जदयूचे उमेदवार नरेंद्र प्रसाद सिंह यांना अटक करण्यात आली. आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. यानंतर त्यांना जामिनावर सोडण्यात आले.

07:30 November 03

चिराग पासवान यांनी केले मतदान

चिराग पासवान यांनी केले मतदान

एलजेपी पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी राघोपूरमधील २४ नंबर मतदान केंद्रावर मतदान केले.

07:23 November 03

सर्व जिल्ह्यांमधील मतदानाला सुरुवात..

आज एकूण १७ जिल्ह्यांमध्ये मतदान पार पडत आहे. या सर्व जिल्ह्यांमधील मतदान प्रक्रियेस सुरूवात झाली आहे.

07:21 November 03

उपमुख्यमंत्र्यांनी केले मतदान

  • I appeal to the people to step out of their homes, cast their vote, maintain social distancing and keep wearing mask: Deputy Chief Minister Sushil Kumar Modi after casting his vote at polling booth no.49 at St Joseph High School in Rajendra Nagar, Patna #BiharElections pic.twitter.com/iTon66FQsO

    — ANI (@ANI) November 3, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदींनी मतदान करत आपला हक्क बजावला. यावेळी त्यांनी जनतेलाही बाहेर पडत मतदान करण्याचे आवाहन केले.

07:17 November 03

बिहारच्या राज्यपालांनी केले मतदान

Bihar Assembly Elections second phase live updates
राज्यपाल फागू चौहान यांनी केले मतदान

राज्यपाल फागू चौहान यांनी सकाळी मतदान प्रक्रिया सुरू होताच आपला हक्क बजावला.

07:14 November 03

शिवसेनेचे नऊ उमेदवार रिंगणात..

दुसऱ्या टप्प्यातील मतदारसंघांमध्ये शिवसेनेच्या नऊ उमेदवारांचा समावेश आहे. संजय कुमार (चिरैय्या), संजय कुमार (फुलपराश), संजय कुमार झा (बेनीपूर), रंजय कुमार सिंह (तरैय्या), विनिता कुमारी (अस्थवां), रवींद्र कुमार (मनेर), जयमाला देवी (राघोपुर), विनोद बैठा (भोरे), शंकर महसेठ (मधुबनी) या उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार आहे.

07:04 November 03

मतदानास सुरुवात..

दुसऱ्या टप्प्यातील मतदानास सुरुवात झाली आहे.

06:33 November 03

सकाळी सातपासून होणार मतदानास सुरुवात..

थोड्याच वेळात निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू होणार आहे.

06:14 November 03

बिहार विधानसभा निवडणूक, आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान

पाटणा : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या बिहारच्या विधानसभा निवडणुकीचा दुसरा टप्पा आज पार पडत आहे. यामध्ये २.८५ कोटी मतदार सुमारे १,५०० उमेदवारांचे भवितव्य ठरविणार आहेत. आज ९४ जागांवर मतदान पार पडणार आहे.

Last Updated : Nov 3, 2020, 7:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.