ETV Bharat / bharat

भारतातील मोठ्या औद्योगिक दुर्घटना... - भोपाळ वायू गळती

धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील एमआयडीसीत असलेल्या एका केमिकल कंपनीत स्फोट झाल्याची घटना आज सकाळी घडली. या स्फोटात, कंपनीतील १५ कर्मचारी ठार झाले आणि 65 जण जखमी झाले.  हा स्फोट इतका भीषण होता की, कंपनीच्या आजूबाजूच्या गावांनाही स्फोटचा हादरा बसला आहे. कंपनीजवळील शेतातील काही जनावरेही या स्फोटामुळे दगावली. याच पार्श्वभूमीवर जाणून घेऊयात भारतातील काही मोठ्या औद्योगिक दुर्घटनांविषयी..

Biggest industrial accidents in india
author img

By

Published : Sep 1, 2019, 5:46 AM IST

धुळे - जिल्ह्यातील शिरपूर येथील एमआयडीसीत असलेल्या एका केमिकल कंपनीत स्फोट झाल्याची घटना आज सकाळी घडली. या स्फोटात, कंपनीतील १५ कर्मचारी ठार झाले आणि 65 जण जखमी झाले. हा स्फोट इतका भीषण होता की, कंपनीच्या आजूबाजूच्या गावांनाही स्फोटचा हादरा बसला आहे. कंपनीजवळील शेतातील काही जनावरेही या स्फोटामुळे दगावली...

याच पार्श्वभूमीवर जाणून घेऊयात भारतातील काही मोठ्या औद्योगिक दुर्घटनांविषयी..

  • ३ डिसेंबर १९८४ : भोपाळच्या युनियन कार्बाईड कॉर्पोरेशन कंपनीच्या कीटकनाशक प्लांटमधून चाळीस टन मिथिल आयसोसायनेट वायूची गळती झाली होती. हा वायू हवेमधून आसपासच्या भागात पसरला. ही दुर्घटना इतकी भीषण होती, की आज ३५ वर्षांनंतरही याचा परिणाम दिसून येतो. यावेळी मृतांची संख्या ही साधारणपणे २० ते २५ हजारांच्या घरात होती. मात्र, सरकारच्या आकडेवारीमध्ये ५ हजार संख्येची नोंद आहे.
  • बॉम्बे डॉक्स दुर्घटना, १९४४ : मुंबईच्या व्हिक्टोरिया डॉकमध्ये दोन भीषण स्फोट झाले, जेव्हा सोने, दारूगोळा आणि इतर साहित्य घेऊन जाणाऱ्या एका वाहिनीला आग लागली. यावेळी आसपासची सर्व जहाजे बुडाली होती. मृतांची संख्या जवळपास ८०० च्या घरात होती.
  • चासनाला खाण दुर्घटना, १९७५ : भारतातील सर्वात मोठी खाण दुर्घटना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या दुर्घटनेत ३७२ खाण कामगारांचा मृत्यू झाला होता. धनबादमधील या कोळशाच्या खाणीतील विस्फोटानंतर पूरही आल्यामुळे जास्त नुकसान झाले होते.
  • कोरबा चिमणी दुर्घटना, २००९ : छत्तीसगडधील रायपूरपासून २३० किलोमीटर दूर असलेल्या, भारत अॅल्युमिनिअम कंपनीमधील एका पॉवर प्लांटच्या बांधाकामावेळी चिमणी पडून ४५ कामगारांचा मृत्यू झाला होता.
  • जयपूर ऑईल डेपो आग दुर्घटना, २००९ : इंडियन ऑईल कॉर्परेशनच्या जयपूर येथील डेपोमध्ये आग लागून १२ जणांचा मृत्यू झाला होता, तसेच १३० लोक जखमी झाले होते.
  • जून २०१२ : आरआयएनएल कंपनीच्या विशाखापट्टनम येथील एका प्लांटमध्ये दुर्घटना होऊन १२ पेक्षा जास्त कामगारांचा आणि अधिकाऱयांचा मृत्यू झाला होता.
  • २३ नोव्हेंबर २०१४ : छत्तीसगडमधील अल्ट्राटेक सिमेंटच्या कारखान्यात क्लिंकर मशीन पडून सात कामगार जखमी झाले होते.
  • २ जुलै २०१६ : चेंबूरमध्ये राष्ट्रीय रसायन आणि खत कंपनीमध्ये बॉयलरचा स्फोट होऊन तीन कामगार ठार, तर तीन कामगार जखमी झाले होते.
  • २६ मे २०१६ : डोंबिवली येथील एका कंपनीत बॉयलरचा स्फोट होऊन १२ लोकांचा मृत्यू झाला होता.
  • १ नोव्हेंबर २०१७ : उत्तर प्रदेशमध्ये एनटीपीसीच्या पॉवर प्लांटमध्ये बॉयलरचा स्फोट होऊन जवळपास ३४ लोकांचा मृत्यू झाला होता.
  • ८ मार्च २०१८ : पालघरमधील एका रसायन कारखान्यात लागलेल्या आगीमध्ये तीन लोकांना आपला जीव गमवावा लागला होता, तर १५ कामगार जखमी झाले होते.
  • १२ जुलै २०१८ : आंध्र प्रदेशच्या एका स्टील कारखान्यात विषारी वायूची गळती होऊन सहा लोकांचा मृत्यू झाला होता, तर ५ लोक गंभीररीत्या जखमी झाले होते.
  • ९ ऑक्टोबर २०१८ : छत्तीसगडमधील भिलाई स्टील प्लांटमधील गॅस पाईपलाईनमध्ये झालेल्या स्फोटात जवळपास ९ कामगार ठार तर, १४ जखमी झाले होते.
  • ३१ ऑगस्ट २०१९ : धुळ्यातील एका रसायन कारखान्यात नायट्रोजन गॅस सिलेंडरच्या साखळी विस्फोटांमध्ये १५ लोकांचा मृत्यू, तर ६५ लोक जखमी झाले

हेही वाचा :धुळे: शिरपूरच्या स्फोटाने निर्माण केले अनेक प्रश्न

Intro:Body:

national

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.