भोपाळ - कोरोनामुळे देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन सध्या सुरू आहे. मध्य प्रदेशच्या भोपाळमध्येही लोकं घरात बसून आहेत. लॉकडाऊनचा फटका रस्त्यावरील भटक्या जनावरांना जास्त बसत आहे. दरम्यान, या जनावरांना रोज रात्रीच्या वेळी खाण्यापिण्याची सोय भोपाळमधील दोन व्यक्ती करत आहेत. रुफी खान व अयान अशा या दोघांची नावे आहेत.
लॉकडाऊनच्या दरम्यान जनावरांचे मोठे हाल होत आहेत. त्यामुळे रुफी आणि अयान हे दोघे रात्रीच्या वेळी रस्त्यावर येत या भटक्या जनावरांना खाण्याची सोय करत आहेत. माणसांसाठी जेवणाची सोय केली जाते. परंतु, अशा भटक्या जनावरांसाठी काहीच केले जात नसल्याची खंत या दोघांनी 'ई टीव्ही भारत'सोबत बोलताना व्यक्त केली.
दुसऱ्या दिवशी 'ई टीव्ही भारत'ची टीम या दोघांच्या घरी परिस्थिती पाहण्यासाठी गेली असता, यांच्या घरात मांजरांचा एक कळप व अनेक जनावरं होती. त्यांच्यासाठीही जेवणाची सोय केली होती.
दरम्यान, आम्हाला लहानपणापासूनच प्राणी, जनावरांबाबत खूप प्रेम असून यामुळेच आ्म्ही अॅनिमल लव्हर या ग्रुपसोबत जोडलो असून जनावरांसाठी काम करत असल्याचे रुफी यांनी सांगितले.