भोपाळ - मध्यप्रदेशातील भोपाळ शहराच्या महानगरपालिकेने प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी एक अनोखी मोहीम सुरू केली आहे. पर्यावरण रक्षणासाठी हा उपक्रम सर्व देशासाठी प्रेरणादायी ठरला आहे.
जुने कपडे द्या, कापडी पिशव्या मोफत न्या; पर्यावरण संरक्षणासाठी भोपाळ पालिकेचा अनोखा उपक्रम - plastic ban bhopal
मध्यप्रदेशातील भोपाळ शहराच्या महानगरपालिकेने प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी एक अनोखी मोहीम सुरू केली आहे. शहर प्लास्टिक मुक्त करण्यासाठी महापालिकेने शहरात विविध ठिकाणी कापडी पिशव्या शिवून देणारी दुकाने सुरू केली आहेत.
भोपाळ - मध्यप्रदेशातील भोपाळ शहराच्या महानगरपालिकेने प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी एक अनोखी मोहीम सुरू केली आहे. पर्यावरण रक्षणासाठी हा उपक्रम सर्व देशासाठी प्रेरणादायी ठरला आहे.
जुने कपडे द्या, कापडी पिशव्या मोफत न्या; पर्यावरण संरक्षणासाठी भोपाळचा अनोखा उपक्रम
भोपाळ - मध्यप्रदेशातील भोपाळ शहराच्या महानगरपालिकेने प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी एक अनोखी मोहीम सुरू केली आहे. पर्यावरण रक्षणासाठी हा उपक्रम सर्व देशासाठी प्रेरणादायी ठरला आहे.
शहर प्लास्टिक मुक्त करण्यासाठी महापालिकेने शहरात विविध ठिकाणी कापडी पिशव्या शिवून देणारी दुकाने सुरू केली आहेत. या दुकानांमध्ये जुन्यापुराण्या कपड्यांपासून पिशव्या बनवण्यात येतात.
या दुकानांमध्ये नागरिक फक्त ५ रुपयांत कापडी पिशवी विकत घेऊ शकतात. जर कोणी घरातील जुने कपडे घेऊन आले तर पाच रुपयेही घेतले जात नाहीत. जुन्या कपड्यांपासून बनवलेल्या पिशव्यांचा वापर वाढल्याने प्लास्टिक कचरा कमी व्हायला मदत होत आहे. या उपक्रमाची सगळीकडे प्रशंसाही होत आहे.
केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण अहवालात मध्यप्रदेशातील इंदौर शहराने सलग तिसऱ्यांदा बाजी मारली आहे. तर मागील वर्षी देशातील सर्वात स्वच्छ राजधानीचा मान भोपाळ शहराला मिळाला आहे. पर्यावरण संरक्षणासाठी मध्यप्रदेश राज्याने उचललेले पाऊल नक्कीच प्रंशसनीय आहे. यापासून इतर राज्यांनाही प्रेरणा मिळत आहे.