नवी दिल्ली - हा अपमान बहुजन समाज कधीही विसरणार नाही, मी पुन्हा येईल, अशा आशयाचे ट्विट भीम आर्मीचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांनी केले आहे. यासोबतच, तेलंगाणामध्ये हुकूमशाही सुरू असल्याचे म्हणत, या ट्वीटमध्ये त्यांनी तेलंगाणाच्या मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हँडलला टॅगही केले आहे.
-
तेलंगाना में तानाशाही चरम पर है लोगों के विरोध प्रदर्शन करने के अधिकार को छीना जा रहा है पहले हमारे लोगों को लाठियां मारी गई फिर मुझे गिरफ्तार कर लिया गया,अब मुझे एयरपोर्ट ले आएं है दिल्ली भेज रहे है। @TelanganaCMO याद रखे बहुजन समाज इस अपमान को कभी नही भूलेगा। जल्द वापिस आऊंगा
— Chandra Shekhar Aazad (@BhimArmyChief) January 27, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">तेलंगाना में तानाशाही चरम पर है लोगों के विरोध प्रदर्शन करने के अधिकार को छीना जा रहा है पहले हमारे लोगों को लाठियां मारी गई फिर मुझे गिरफ्तार कर लिया गया,अब मुझे एयरपोर्ट ले आएं है दिल्ली भेज रहे है। @TelanganaCMO याद रखे बहुजन समाज इस अपमान को कभी नही भूलेगा। जल्द वापिस आऊंगा
— Chandra Shekhar Aazad (@BhimArmyChief) January 27, 2020तेलंगाना में तानाशाही चरम पर है लोगों के विरोध प्रदर्शन करने के अधिकार को छीना जा रहा है पहले हमारे लोगों को लाठियां मारी गई फिर मुझे गिरफ्तार कर लिया गया,अब मुझे एयरपोर्ट ले आएं है दिल्ली भेज रहे है। @TelanganaCMO याद रखे बहुजन समाज इस अपमान को कभी नही भूलेगा। जल्द वापिस आऊंगा
— Chandra Shekhar Aazad (@BhimArmyChief) January 27, 2020
भीम आर्मीचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांना हैदराबादमध्ये अटक करण्यात आली होती. त्यानंतर हैदराबाद पोलिसांनी त्यांना पुन्हा दिल्लीला पाठवून दिले. हैदराबादमध्ये होत असलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधी आंदोलनात सहभागी झाल्यामुळे त्यांना ताब्यात घेतले गेले होते. सोमवारी सकाळी दिल्लीमध्ये पोहोचल्यानंतर त्यांनी तेलंगाणा सरकारवर टीका केली, तसेच हैदराबाद पोलिसांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
तेलंगाणा सरकारवर चढवला हल्ला..
तेलंगाणामध्ये हुकूमशाही सुरू आहे, लोकांचा आंदोलन करण्याच्या अधिकारावर गदा आणली जात आहे. आधी आमच्या लोकांवर लाठीचार्ज केला गेला, त्यानंतर मला अटक करून दिल्लीला परत पाठवण्यात आले. लक्षात ठेवा, बहुजन समज हा अपमान कधीही विसरणार नाही, मी लवकरच पुन्हा येईन, अशा आशयाचे ट्वीट त्यांनी केले आहे.
आझाद यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेमध्ये नेण्यात आले असल्याची माहिती त्यांच्या समर्थकांनी दिली. त्यांची प्रकृती सुधारल्यास, ते आज (मंगळवार) कर्नाटकमध्ये दोन मोर्चांमध्ये सहभागी होणार आहेत. यासोबतच २९ जानेवारीला पत्रकार गौरी लंकेश यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमालाही ते उपस्थित राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
दरम्यान, हैदराबादमधील आंदोलनाची परवानगी घेण्यात आली नव्हती. त्यामुळे आझाद यांना ताब्यात घेऊन परत पाठवल्याचे हैदराबाद पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा : अनुराग ठाकूर यांच्या वक्तव्यावर दिल्ली निवडणूक आयोगाने मागवला अहवाल..