ETV Bharat / bharat

कोरोनावर लस बनवणे इतके का अवघड..?

इन्फ्ल्यूएंझा ते पोलिओ, मानवी उत्क्रांतिची पहाट झाल्यापासून आम्ही अनेक रोगकारक परिस्थितीशी लढा देत आलो आहोत. बहुतेक सर्व लढायांमध्ये आम्ही विजयी म्हणून समोर आलो आहोत. पण अलिकडची नव्या कोरोना विषाणुशी लढाई इतकी गुंतागुतीची का झाली आहे? पहा भारत बायोटेकचे प्रमुख डॉ. रचेस इल्ला यांनी ईटीव्ही भारतला दिलेली विशेष मुलाखत..

Bharat Biotech official explains the stages of vaccine development
कोरोनावर लस बनवणे इतके का अवघड..?
author img

By

Published : Apr 6, 2020, 5:16 PM IST

लस उत्पादित करणे अवघड आहे पण सध्याच्या स्थितीत, अत्यंत महत्वाचे-डॉ. रचेस इल्ला

सूक्ष्मदर्शकातून दिसणाऱ्या जीवजंतुंच्या विरोधातील लढा आमच्यासाठी नवा नाही. इन्फ्ल्यूएंझा ते पोलिओ, मानवी उत्क्रांतिची पहाट झाल्यापासून आम्ही अनेक रोगकारक परिस्थितीशी लढा देत आलो आहोत. बहुतेक सर्व लढायांमध्ये आम्ही विजयी म्हणून समोर आलो आहोत. पण अलिकडची नव्या कोरोना विषाणुशी लढाई इतकी गुंतागुतीची का झाली आहे? जग या विषाणुला इतके का घाबरत आहे? यापूर्वी आम्ही अनेक विषाणुंविरोधातील युद्ध जिंकले असताना कोविड-१९ विरोधातील युद्ध कधी जिंकू शकणार आहोत?

भारत बायोटेकचे व्यवसाय विकास प्रमुख डॉ. रचेस इल्ला यांच्यासमोर ईनाडूने हे प्रश्न उपस्थित केले. कंपनी एक लस विकसित करत आहे आणि सध्या चिकित्साविषयक परिक्षा सुरू आहेत. डॉ. इल्ला यांची ही फक्त ईनाडूला दिलेली मुलाखत देत आहोत, ज्यांनी लस विकसित करण्यातील आव्हाने आणि त्यावर मात करण्याचे मार्ग याबाबत उहापोह केला आहे.

नवा कोरोना विषाणु जगाला इतके घाबरवून का सोडत आहे?

त्यासाठी अनेक कारणे आहेत. प्रथम, हा विषाणु मानवजातीसाठी नवा आहे. सार्स-सीओव्ही २ विषाणु या कोरोना विषाणुच्या कुटुंबाचा सदस्य आहे आणि वटवाघळांकडून तो मानवांकडे संक्रमित होतो, असे म्हटले जाते. चीनमध्ये अशा प्राण्याकंडून मानवांमध्ये संक्रमण झाल्याच्या घटना घडल्या आहेत, जेथे लोक कच्चे मांस खातात. हा नव्या प्रकारचा तणाव असल्याने, आमची प्रतिकारशक्ती त्याच्याविरोधात लढा देण्यास अकार्यक्षम आहे. मधुमेह, ह्रदयविकार आणि फुफ्फुसाचे विकार, कर्करोग असलेल्या लोकांमध्ये प्रतिकारशक्ती अगोदरच कमजोर झालेली असते. अशा व्यक्तिंना संसर्गाचा उच्च प्रमाणात धोका असतो. दुसरे, संक्रमणाचा वेग अत्यंत भयानक आहे. अभ्यासांनी याला दुजोरा दिला आहे की एक संसर्गग्रस्त व्यक्ति किमान ३ व्यक्तिंमध्ये या विषाणुचा प्रसार करू शकते. तरूण आणि मध्यमवयीन लोकांमध्ये याची लक्षणे सौम्य असतात; पण ही लक्षणे न दिसणाऱ्या वाहक व्यक्ति वृद्धांपर्यंत संसर्ग पोहचवू शकतात.कोणतेही संक्रमण आतापर्यंत इतके भयंकर नव्हते. त्यामुळेच कोविड-१९ ची दहशत साऱ्या जगभर पसरली आहे.

पोलिओ आणि देवी रोगासाठी लस विकसित करण्याचा आम्हाला इतिहास आहे. मग कोविड-१९ साठी लस तयार करणे इतके अवघड का आहे?

वास्तविक ते इतके काही अवघड नाही पण लस विकसित करणे वेळखाऊ आणि गुंतागुतीचे दोन्ही आहे. प्रतिजैविक किंवा विषाणुविरोधातील परिणामकारक औषध उत्पादन करण्यासाठी ५ ते ७ वर्षे लागतात. ती खूप खर्चिकही प्रक्रिया आहे.

दुसरीकडे, लस या आरोग्यसंपन्न लोकांना आजाराचा प्रतिबंध करण्यासाठी देण्यात येतात. त्यामुळे, लसी या परिणामकारक असण्यापेक्षा सुरक्षित आहेत, याची खात्री करणे महत्वाचे असते. त्यामुळेच एक लस विकसित करण्यासाठी ७ ते २० वर्षांचा कालावधी लागतो. या प्रक्रियेत अनेक टप्पे असतात. भारत बहुतेक सामान्य औषधांचे उत्पादन करतो. याचा अर्थ, अमेरिकेसारख्या देशांमध्ये उत्पादित झालेल्या औषधांचे हक्क आम्ही विकत घेतो आणि त्यांचे उत्पादन येथे करण्यास सुरूवात करतो. परंतु या मार्गाने लस विकसित करणे अशक्यच आहे. पहिल्यांदा, आम्हाला संसर्गाला अटकाव करण्यासाठी नवीन औषध शोधून काढले पाहिजे. आम्हाला उत्पादन प्रक्रिया शोधली पाहिजे. त्यानंतर त्यांचा प्रयोग प्राणी आणि मानवांवर केला पाहिजे. या सर्वासाठी ७ ते २० वर्षे लागतात. इबोलावरील लस अलिकडेच शोधण्यात आली आहे. ती लस शोधण्यासाठी ३ ते ५ वर्षे लागली. म्हणून, नव्या कोरोना विषाणुवरील लस शोधण्यासाठी १८ महिने ते २ वर्षे इतका कालावधी लागू शकतो. ही कालमर्यादा कमी करण्याच्या दिशेने आम्ही प्रयत्न करत आहोत.

या विषाणुला आमच्या शरिरात प्रवेश करण्यापासून कसे रोखायचे?

संसर्गग्रस्त लोकांच्या द्रवात आम्ही नव्या कोरोना विषाणुचे प्रतिविष शोधू शकतो. हे प्रतिविष काढून आरोग्यसंपन्न लोकांच्या शरिरात इंजक्शनद्वारे घुसवल्याने आम्हाला सकारात्मक परिणाम मिळू शकतो. याला दुखण्यातून बरा होत असलेल्या व्यक्तिचा प्लाविका सिद्धांत (Plasma theory) असे म्हटले जाते. हा अभ्यास प्रथम न्यूयॉर्कमध्ये सुरू झाला. पण हे केवळ तात्पुरते औषध आहे. कायमस्वरूपी तोडगा हा उपलब्ध जिनोम मालिकेचा अभ्यास करून लस विकसित करणे हाच आहे. त्यापूर्वी, विषाणुचा कोणता भाग आमच्या पेशींवर हल्ला करतो, हे समजून घेण्याची गरज आहे. या विषाणुला प्रतिकार करण्यासाठी तितक्याच क्षमतेचे प्रतिविष तयार केले पाहिजे. विषाणुच्या बाह्य भागातील खिळ्यासारखे अणकुचीदार भाग मानवी शरिरावर हल्ला करतात. चीनी सरकारने नव्या कोरोना विषाणुची जिनोम मालिका जानेवारीत जारी केली आहे. तेव्हापासून, विषाणुच्या प्रोटिनयुक्त अणकुचीदार खिळ्यांसारख्या भागांचा प्रतिकार करण्याचे मार्ग शोधत आहोत.

एनसीओव्ही संसर्गावर उपचार करण्यासाठी काही औषधे आहेत का?

सध्याच्या घडीला, कोविड-१९ वर उपचार करण्यासाठी कोणतेही औषध नाही. डॉक्टरांनी मलेरियाच्या उपचारात वापरले जाणारे हायड्रोक्सीक्लोरोक्विन आणि प्रतिजैविक अझिथ्रोमायसिन परिणामकारक होऊ शकतात, असे शोधून काढले आहे, पण त्याला अजून अनुभवजन्य पुरावा काहीच नाही. या औषधांचे गंभीर दुष्परिणामही होतात. म्हणून, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अशी औषधे घेऊ नका, असा इषारा आम्ही देत आहोत. सुरूवातीला, एचआयव्हीविरोधी औषधे परिणामकारक असल्याचे आढळले होते, पण काही दिवसांनी त्यांचा प्रभाव नाहीसा होत असल्याचे दिसले.

काही वैज्ञानिकांनी ओसेल्टामिव्हिर या विषाणुविरोधी औषध वापरण्याचे सुचवले होते, पण त्याचे परिणाम अगदीच निष्प्रभ ठरले. आतापर्यंतच्या संशोधनातील आकडेवारीनुसार, रेमडेव्हिसिव्हिर हे चांगले काम करत आहे, असे दिसते. जर अंतापासून शेवटपर्यंत प्रयोग यशस्वी झाले तर, आम्ही स्थानिक पातळीवर हे औषध उत्पादित करू शकतो.

संपूर्ण राष्ट्र विषाणुविरोधात लढा देत आहे. आणखी काही आहे की आम्ही ते करू शकतो?

यासंदर्भात आमच्या केंद्र आणि राज्य सरकारांचे प्रयत्न असाधारण आहेत. २१ देशांचा लॉकडाऊन जाहिर करून १३० कोटी लोकसंख्येला नियंत्रित करणे सोपी गोष्ट नाही. आमचा देश दाट लोकसंख्येचा असलेला देश आहे. आरोग्यसेवेच्या बाबतीत आम्ही फार मजबूत नाहीत. म्हणून, कडक लॉकडाऊन अनिवार्य आहे. प्रत्येक नागरिकाने या निर्णयाचे महत्व जाणून घेतले पाहिजे. प्रत्येकाने कुठेही कमी न पडता सामाजिक अंतर राखण्याचे पालन केले पाहिजे.

भारत हा लसींचा सर्वात मोठा पुरवठादार देश आहे. या भयानक काळात आम्ही काय भूमिका निभावू शकतो?

जगभरात जन्मलेल्या १० पैकी ६ अर्भके भारतात उत्पादित झालेल्या लसी घेतात. स्वस्त लस बनवण्यात आमची कंपनी क्रमांक एकवर आहे. नेहमीच्या किमतीपेक्षा एक दशांश किमतीत आम्ही लस बनवतो. परिणामकारक लसी बनवण्याचा आमचा इतिहास असल्याने, कोविड-१९ वर लस शोधून काढणे ही आमची नैतिक जबाबदारी आहे. यासाठी, आम्हाला आमच्या स्वतःच्या बळावर किंवा लस शोधण्यात गुंतलेल्या इतर कंपन्यांबरोबर भागीदारी करावी लागेल. याच कारणासाठी, आम्ही भारत बायोटेक आंतरराष्ट्रीय संघाबरोबर भागीदारी करत आहोत. त्यामुळे निश्चितच त्वरित परिणाम दिसतील. भारतीय औषध महानियंत्रकांनी प्राणी आणि मानवांवर एकाच वेळेस परिक्षा करण्यास मंजुरी दिली आहे. हा एक अभूतपूर्व निर्णय आहे. डीसीजीआय यांनी असे प्रस्ताव घेऊन येणार्या औषध आणि निदानात्मक कंपन्यांसाठी अनुदान मंजूर केले आहे. भारत सरकारतर्फे हे सर्व महत्वाचे निर्णय घेण्यात येत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.