भोपाळ - मध्यप्रदेशमध्ये विधानसभेच्या 28 जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. 28 मतदार संघापैकी तब्बल 26 मतदार संघात दलीत मतदार मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे या 28 जागांच्या पोटनिवडणुकीमध्ये दलित समाज कींग मेकरची भूमिका बजावणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे प्रत्येक पक्ष मध्य प्रदेशमध्ये दलीत समाजाची मते आपल्याला कशी मिळतील यावर लक्ष केंद्रित करतांना दिसून येत आहे.आता दलित समाज आपले मत कोणत्या पक्षाच्या पारड्यात टाकणार हे पहाणे आता महत्वाचे ठरणार आहे.
प्रथमच मायावती या पोटनिवडणुकीत सर्व जागांवर बसपाचे उमेदवार उभे करून आपले निशीब अजमावत आहेत. दलित समाज बहुसंख्येने असलेल्या मतदार संघात त्यांना फायदा होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. गेल्या निवडणुकीत ग्वाल्वेर आणि चंबाई मतदारसंघातून मायावती यांनी बसपचे उमेदवार उभे केले होते. आणि दोनही ठिकाणांवरून त्यांचा विजय झाला होता.
दरम्यान भाजपचे प्रवक्ते रजनीश अग्रवाल यांनी म्हटलं आहे की, इतर पक्षांच्या विजयाचे गणित जरी जातीय समीकरणांवर अवलंबून असले, तरी मात्र भाजप मध्य प्रदेशमध्ये विकास कामांच्या आधारावरच ही निवडणूक लढवणार आहे.