बेळगाव - महाराष्ट्र व कर्नाटकच्या सीमेवर असलेल्या बेळगावमध्ये ग्राहक ही भगवान होता है, असे म्हणते एका दुकानदाराने तळीरामाचे चक्क हार घालून स्वागत केले.
कोरोनाच्या पार्श्वभूमी देशात टाळेबंदी असल्याने सर्व व्यवहार ठप्प होते. या काळा अनेक तळीरामांनी विविध प्रकारे दारुचे दुकान सुरु करण्याची मागणीही केली होती. त्यानुसार राज्यशासनाने झोननिहाय सशर्त मद्यविक्री दुकाने उघडण्याची परवानगी दिली. सुमारे पन्नास दिवस दारुविना व्याकुळ झालेल्या तळीरामांनी सकाळी सहा वाजल्यापासूनच दुकानांसमोर गर्दी करायला सुरुवात केली.
या काळात मद्यविक्री व्यवसायीकांचेही सर्व व्यवहार ठप्प असल्याने मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे त्यांनीही शासनाने घालून दिलेल्या अटींचे पालन करत दुकान सुरू केले. शासनाच्या या निर्णयाने मद्यपी व मद्यविक्री व्यवसायीकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. काही तळीराम तर पहिला लाभार्थी ठरण्यासाठी पहाटेपासून दुकानासमोर जाऊन ठिय्या मारला होता. ग्राहकही भगवान होता, या हिंदीतील म्हणी प्रमाणे बेळगावच्या एका दुकानदाराने पहिल्या ग्राहकाचे हार घालून सत्कार करत स्वागत केले.
हेही वाचा - दिल्लीत तळीरामांची भली मोठी रांग... पोलिसांनी केला लाठीचार्ज