डेहराडून - बद्रीनाथ धामाचे दरवाजे येत्या 30 एप्रिलला उघडण्यात येणार आहेत. बुधवारी पुजा-पाठ झाल्यानंतर दरवाजे उघडण्याचा दिनांक निश्चित करण्यात आला. मंदिर समितीच्या अधिकाऱ्यानुसार येत्या 30 एप्रिलला ब्रह्म मुहूर्त असून सकाळी ०४:३० ला भक्तांसाठी दरवाजे उघडण्यात येणार आहेत.
गेल्यावर्षी 10 मे ला मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले होते. यावर्षी अक्षय्य तृतीया लवकर आल्यामुळे दरवाजे लवकर उघडण्यात येणार आहेत. 17 नोव्हेंबरला वैदिक मंत्रोच्चाराच्या गजरात सांयकाळी ०५:३० ला दरवाजे बंद करण्यात आले होते.
१२ ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे हिवाळी हंगामामुळे भाविकांच्या दर्शनासाठी बंद ठेवण्यात येतात. आद्य शंकराचार्य यांनी ९व्या शतकात बद्रीनाथची पुनर्स्थापना केली. बद्रीनाथ हे हिंदू धर्मामधील सर्वात पवित्र स्थानांपैकी एक असून ते चार धाम पैकी आहे. येथील बद्रीनाथ मंदिराला दरवर्षी सुमारे लाख भाविक भेट देतात.
बद्रीनाथ मंदिर हे भारत देशाच्या उत्तराखंड राज्यातील बद्रीनाथ गावामधील एक विष्णूचे हिंदू मंदिर आहे. हिंदू धर्मामधील सर्वात मानाच्या पवित्र चार धाम तीर्थक्षेत्रांपैकी बद्रीनाथ मंदिर एक आहे. समुद्रसपाटीपासून ३,१३३ मी (१०,२७९ फूट) उंचीवर उत्तराखंडच्या चामोली जिह्यात अलकनंदा नदीच्या काठावर असलेले हे मंदिर केवळ काही महिने दर्शनासाठी खुले असते.