ETV Bharat / bharat

बच्चन पांडे चित्रपटाच्या शूटिंगसाठी 100 जणांची टीम राजस्थानमध्ये, जैसलमेरमध्ये होणार शूटिंग - अ‍ॅक्शन-कॉमेडी बच्चन पांडे

दिग्दर्शक फरहाद संभाजीच्या अ‍ॅक्शन-कॉमेडी बच्चन पांडेसाठी अक्षय आणि त्याची कृती सेनॉन पुन्हा एकत्र येत आहेत. जानेवारी 2021 च्या पहिल्या आठवड्यात जवळपास 100 जणांची टीम राजस्थानमध्ये चित्रपटाच्या शूटिंगसाठी रवाना होणार आहे.

akshay kumar kriti sanon in jaisamlmer
अ‍ॅक्शन-कॉमेडी बच्चन पांडे
author img

By

Published : Dec 28, 2020, 12:06 PM IST

हैदराबाद - बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमार आणि कृती सेनाॅन यांच्या अॅक्शन कॉमेडी चित्रपटाच्या शूटिंगला आता जैसलमेरमध्ये सुरुवात होणार आहे. लॉकडाऊन काळात अनेक सिनेमांची शूटिंग रखडली होती. कोविड-19चे निर्बंध कमी झाल्यावर पुन्हा सेटवर येणारा अक्षय कुमार पहिला A-लिस्टर असल्याचे म्हणता येईल. त्याचा स्पाय-थ्रिलर, बेल बॉटम हा चित्रपट जगातील पहिला चित्रपट ठरला आहे. या सिनेमाची शूटिंग महामारीच्या वेळी पूर्ण झाली आहे. आनंद एल राय यांच्या अतरंगी रे च्या सेटवर उतरण्यापूर्वी अक्षयने पृथ्वीराजसाठी देखील शूट केले होते. आणि आता अक्षय बच्चन पांडेच्या शूटिंगसाठी सज्ज झाला आहे.

जैसलमेरमध्ये शूटिंग

दिग्दर्शक फरहाद संभाजीच्या अ‍ॅक्शन-कॉमेडी बच्चन पांडेसाठी अक्षय आणि कृती सेनॉन पुन्हा एकत्र येत आहेत. हाऊसफुल 4 मध्ये कृतीने अक्षयची कोस्टार म्हणून काम केले होते. जानेवारी 2021 च्या पहिल्या आठवड्यात जवळपास 100 जणांची टीम राजस्थानमध्ये चित्रपटाच्या शूटिंगसाठी रवाना होणार आहे. शूटिंगसाठी मुख्य 30 दिवसांचे नियोजन आखण्यात आले आहे. प्रामुख्याने गडिसार लेक आणि जैसलकोट याठिकाणी शूटिंग होणार आहे.

अक्षय या चित्रपटात एका गँगस्टरच्या भूमिकेत दिसणार आहे तर कृती एका पत्रकाराच्या भूमिकेत असणार आहे. नाडियादवाला यांच्या ग्रँडसन एन्टरटेंन्मेंटच्या बॅनरखाली हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. बच्चन पांडेमध्ये अक्षय कुमार, कृती सेनॉन यांच्यासोबत जॅकलिन फर्नांडिस, पंकज त्रिपाठी आणि अर्षद वारसी यांचीही भूमिका असणार आहे.

हेही वाचा - 'सरकारच्या खोटेपणावर बोलणे, राज्यकर्त्यांना अपमान वाटत असेल तर लोकशाहीचा अंत जवळ आला'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.