ETV Bharat / bharat

माजी आमदार बाबूश मोन्सेरात यांची काँग्रेसमध्ये घरवापसी

माजी आमदार बाबूश मोन्सेरात यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. २०१५ मध्ये आमदार असताना पक्षविरोधी कृतीमुळे काँग्रेसमधून त्यांना निलंबित करण्यात आले होते.

माजी आमदार बाबूश मोन्सेरात यांची काँग्रेसमध्ये घरवापसी
author img

By

Published : Apr 18, 2019, 3:01 PM IST

Updated : Apr 18, 2019, 3:09 PM IST

पणजी - माजी आमदार बाबूश मोन्सेरात यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. २०१५ मध्ये आमदार असताना पक्षविरोधी कृतीमुळे काँग्रेसमधून त्यांना निलंबित करण्यात आले होते. त्यांच्या प्रवेशामुळे विधानसभेच्या पणजी मतदारसंघातील पोटनिवडणुकीची चूरस वाढली आहे.

काँग्रेस भवनात आयोजीत करण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर, आमदार दिगंबर कामत, रवी नाईक, आलेक्स रेजिनाल्ड, बाबूश यांच्या पत्नी आणि काँग्रेस आमदार जेनिफर मोन्सेरात आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

माजी आमदार बाबूश मोन्सेरात यांची काँग्रेसमध्ये घरवापसी

मोन्सेरात म्हणाले, की अपक्ष किंवा अन्य एखाद्या पक्षात प्रवेश करणे माझ्यासमोर पर्याय होते. परंतू, पणजीचा विकास आणि रोजगार यांचा विचार करून मी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी २५ वर्षे पणजीचे प्रतिनिधित्व केले. परंतू, पणजीचा विकास आणि येथील युवकांना रोजगार देण्यात ते अपयशी ठरले. त्यामुळे पणजीतील लोकांचा कल विचारात घेत ही घरवापसी केली आहे.

माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनामुळे पणजी विधानसभेची जागा रिक्त झाली आहे. तेथे लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याबरोबर म्हणजेच दि. १९ मे रोजी मतदान होणार आहे. तर २२ एप्रिलपासून उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. त्यामुळे बाबूश हे पोटनिवडणूक समोर ठेवूनच काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत. परंतू, आज अधिकृतरित्या त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही.

पणजी महापालिका काँग्रेसकडे

गोव्यात केवळ पणजी शहरात महापालिका आहे. यावर मागील अनेक वर्षे बाबूश गटाची सत्ता आहे. जरी ते सत्तेत असले आणि नसले तरीही. त्यामुळे त्यांच्या काँग्रेस प्रवेशाने महापालिकेची सत्ता काँग्रेसकडे आली आहे. या प्रवेशावेळी महापौर उदय मडकईकर, उपमहापौर आणि सर्व नगरसेवक यांनीही बाबूश यांच्यासोबत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

Intro:पणजी : माजी आमदार बाबूश मोन्सेरात यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर याननी त्यांचे स्वागत केले. २०१५ मध्ये आमदार असताना पक्षविरोधी क्रुतीमुळे काँगेसमधून त्यांना नीलंइत करण्यात आले होते. त्यांच्या प्रवेशामुळे विधानसभेच्या पणजी मतदारसंघातील पोटनिवडणुकीची चूरस वाढली आहे.

Body:काँग्रेस भवनात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमासाठी विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर, आमदार दिगंबर कामत, रवी नाईक, आलेक्स रेजिनाल्ड, बाबूश यांच्या पत्नी आणि काँग्रेस आमदार जेनिफर मोन्सेरात आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना मोन्सेरात म्हणाले, अपक्ष किंवा अन्य एखाद्या पक्षात प्रवेश करणे माझ्यासमोर पर्याय होत. परंतु, पणजीचा विकास आणि रोजागार यांचा विचार करून मी काँग्रेस प्रवेश केला आहे. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी २५ वर्षे पणजीचे प्रतिनिधित्व केले परंतु, पणजीचा विकास आणि येथील युवकांना रोजगार देण्यात ते अपयशी ठरले. त्यामुळे पणजीतील लोका़चा कर विचारात घेत ही घरवापसी केली आहे.
त्यांच्या पक्षप्रवेशाविषयी बोलताना माजी मुख्यमंत्री तथा मडगावचे आमदार दिगंबर कामत म्हणाले की, माझ्या सरकारमध्ये मंत्री असतान विकास कसा केला जातो हे बाबूश यांनी दाखवून दिले आहे. आजही पणजी या राजधानीच्या शहराच्या विकासासाठी काँग्रेसमध्ये आलेले आहेत. त्यांना पणजीच्या लोकांनी पाठिंबा द्यावा. येथील लोकांना काय अपेक्षित आहे याची जाणीव त्यांना आहे. त्यामुळे पुढील तीन वर्षांत विकास काय असतो हे ते पणजीकरांना दाखवून देतील.
माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनामुळे पणजी विधानसभेची जागा रिक्त झाली आहे. तेथे लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याबरोबर म्हणजेच दि. १९ मे रोजी मतदान होणार आहे. तर २२ एप्रिल पासून उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. त्यामुळे बाबूश हे पोटनिवडणूक समोर ठेवूनच काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत. परंतु, आज अधिक्रुतरित्या त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही.
पणजी महापालिका काँग्रेसकडे
गोव्यात केवळ पणजी शहरात महापालिका आहे. यावर मागील अनेक वर्षे बाबूश गटाची सत्ता आहे. जरी ते सत्तेत असले आणि नसले तरीही. त्यामुळे त्यांच्या काँग्रेस प्रवेशाने महापालिकेची सत्ता काँग्रेसकडे आली आहे. या प्रवेशावेळी महापौर उदय मडकईकर, उपमहापौर आणि सर्व नगरसेवक यांनीही बाबूश यांच्यासोबत काँग्रेस प्रवेश केला.

...
बाबूश मोन्सेरात यांचा काँग्रेस प्रवेश

Conclusion:
Last Updated : Apr 18, 2019, 3:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.