जयपूर - राजस्थानची राजधानी जयपूरमधील नाहरगड बायोलॉजिकल पार्कमधून आणखी एक दुख:द बातमी समोर आली आहे. नाहरगड बायोलॉजिकल पार्कमध्ये बुधवारी एका सिंहाचा मृत्यू झाला. बुधवारी पहाटे तीन वाजताच्या सुमारास या सिंहाचा मृत्यू झाला. याठिकाणी 2 दिवसात एक वाघीण आणि एका सिंहाचा मृत्यू झाला आहे.
सिद्धार्थ असे नाव असलेल्या या सिंहाला लेप्टोस्पायरोसिस होण्याचा अंदाज वर्तविला जात होता. परंतु, या सिंहाच्या मृत्यूचे खरे कारण उद्याप समोर आले नाही. तरे पोस्टमॉर्टमनंतरच उघड होईल. दोन दिवसात एक वाघीण आणि एका सिंहांच्या मृत्यूने नाहरगड बायोलॉजिकल पार्क प्रशासन हैराण झाले आहे.
वाघीण रुद्रचा 1 दिवसापूर्वी मंगळवारी मृत्यू झाला. रुद्र वाघीण ही रंभाचे बछडे होते. पंधरा वर्षांच्यानंतर नाहरगड बायोलॉजिकल पार्कमध्ये तसेच जयपुरात पहिल्यांदा 2 वाघांच्या बछड्याचा जन्म झाला होता. गेल्यावर्षी त्यातील एक वाघीन रिद्धीचा मृत्यू झाला होता. गेल्या 10 महिन्यांत एकूण 5 वाघांचा मृत्यू झाला आहे. सिद्धार्थ पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रस्थानी असायचा. मात्र, त्याचा मृत्यू झाला आहे.