मुथरा - पतंजली उद्योग आणि आपल्या वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असणारे रामदेव बाबा आता पुन्हा त्यांच्या योगामुळे हायलाइट झाले आहेत. काही दिवसांपूर्वी रामदेव बाबांनी हत्तीवर बसून योगा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा प्रयोग फसला आणि ते धपकन् खाली पडले. त्यानंतर ते खुप ट्रोल झाले होते. मात्र, त्यांनी हार मानली नसून पुन्हा हत्तीवर योगा करण्याचा प्रयत्न केला आणि यावेळी त्यांना यश आले आहे.
बुधवारी रामदेव बाबा यांनी गुरू शरणानंद यांची भेट घेतली. त्यांच्या आश्रमात त्यांनी योग शिकवला. मात्र, आश्रमात हत्ती पाहिल्यानंतर त्यांना पुन्हा हत्तीवर बसून योगा करण्याची इच्छा झाली. यावेळी हत्तीवर बसून योगा करताना, ते खाली पडले नसून त्याच्या प्रयोगाला यश आले आहे. यावेळी ते माध्यमांपासून दूर राहिले.
यापूर्वीही हत्तीवर बसून योगा करण्याचा प्रयत्न -
यापूर्वीही हत्तीवरून योगा करताना खाली पडल्यानंतर रामदेव बाबा यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. 22 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये हत्तीवर बसून बाबा रामदेव योगासनातले एक आसन शिकवत होते. हत्तीवर बसून बाबा रामदेव योगासनं करत असताना अचानक हत्ती हलला. त्यामुळे रामदेव बाबांचा तोल गेला आणि ते खाली पडले. मात्र या घटनेत त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही.
हेही वाचा - हिमाचल प्रदेशात जोरदार बर्फवृष्टी, अटल बोगदा पर्यटकांसाठी बंद