अयोध्या (उ.प्र)- येत्या बुधवारपासून (१० जून) अयोध्येतील राम मंदिर निर्माणाला सुरूवात होणार आहे. तेव्हा मंदिराच्या पायाभरणीसाठीची वीट लावताच मंदिर निर्माण करायला सुरुवात होणार आहे, असे राम मंदिर विश्वस्त संस्थेच्या प्रवक्त्यांनी सांगितले आहे.
या कार्यक्रमाप्रसंगी राम जन्मभूमीवरील कुबेर टिला मंदिरात शिव प्रार्थना करण्यात येणार आहे. तसेच रुद्राभिषेक विधीही करण्यात येणार आहे. लंकेवर हल्ला करण्यापूर्वी श्री. राम यांनी भगवान शिवची प्रार्थना केली होती. तेव्हापासून ही विधी होत आहे. या नंतरच मंदिराचा पाया घालण्याचे काम सुरू होईल, असे श्री. राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे प्रमुख महंत गोपाल दास यांचे प्रवक्ते महंत कमल नयन दास यांनी सांगितले.
या विशेष प्रार्थना महंत न्रित्य गोपाल दास यांच्या मार्फत कमल नयन दास आणि इतर पुजारी करणार आहेत. सकाळी 8 वाजता या विधींना सुरुवात होणार आहे.
हा धार्मिक सोहळा किमान दोन तास चालेल आणि त्यानंतर मंदिराचा पाया घालून राम मंदिराचे बांधकाम सुरू होईल, असे प्रवक्ते महंत कमल नयन दास यांनी सांगितले.