धनबाद - पश्चिम बंगालमधील कुल्टी येथे एक वेगळेच चित्र पाहायला मिळाले. एक व्यक्ती कोरोना विषाणूची वेशभूषा साकारून हातात भाला घेऊन रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांना धमकावताना दिसत होता. त्यानिमित्ताने का होईना नागरिक लॉकडाऊनचे पालन करत असल्याचे दिसून आले.
जगभरात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. देशात कोरोनाबाधितांची संख्या बाराशेच्यावर पोहोचली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन घोषीत करण्यात आला आहे. मात्र, काही ठिकाणी नागरिक पालन करताना दिसत नाही. संचारबंदी असताना देखील नागरिक विनाकारण रस्त्यांवर फिरताना दिसत आहेत. त्यामुळे पश्चिम बंगालमधील आसनसोलच्या सीमावर्ती भागातील कुल्टी येथील अमित दास यांनी शक्कल लढवून सर्वांना कोरोनाची भीती दाखविण्यास सुरुवात केली. त्याने कोरोनासारखी वेशभूषा साकारला आणि हातामध्ये टोकदार भाला घेतला. त्यानंतर रस्त्यावर फिरणाऱ्या प्रत्येकाला तो धमकावत होता. तसेच जीवनावश्यक वस्तूंसाठी बाहेर पडताना सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची विनंती देखील त्यानी यावेळी केली.