लखनौ - हरियाणा केडरच्या महिला आयएएस अधिकारी राणी नागर आणि त्यांच्या बहिणीवर गाजियाबादमधील त्यांच्या निवासस्थानी रॉडने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात राणी नागर यांच्यासह त्यांची बहीणही जखमी झाली आहे. विनायक मिश्रा, असे हल्लेखोराचे नाव आहे. पोलिसांनी हल्लेखोरांना जेरबंद केले आहे.
श्वानावरुन वाद झाल्याचा हल्लेखोरांचा दावा
हल्लेखोर विनायक हा राणी नागर यांच्या शेजारी भाडेकरू म्हणून वास्तव्यास आहे. राणी यांच्या घरी असलेले श्वान नागरिकांवर हल्ला करतात, असा आरोप विनायकने केला आहे. मात्र, नागर यांनी हा पूर्वनियोजित कट असल्याचे म्हटले आहे.
हेही वाचा - गोव्यात 1 जूनपासून रेल्वे आणि फ्लाईटची संख्या वाढणार