ETV Bharat / bharat

VIDEO: केजरीवाल यांच्यावर पुन्हा हल्ला; 'रोड-शो' दरम्यान तरुणाने लगावली कानशिलात

देश लोकसभा निवडणुकांच्या पाचव्या टप्प्याकडे वाटचाल करत आहे. तर, निवडणुका संपण्याच्या तारखाही जवळ येत आहेत. अशात दिल्लीमध्ये विविध पक्षांच्या प्रचाराला उधाण आले आहे. दरम्यान आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांचा मोतीनगर येथील कर्मपुरा येथे  रोड-शो होता.

author img

By

Published : May 4, 2019, 8:07 PM IST

Kejariwal

नवी दिल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर पुन्हा एकदा हल्ला झाला आहे. शनिवारी दिल्ली येथील पश्चिम लोकसभा मतदार संघात रोड-शोच्या वेळी एका व्यक्तीने त्यांच्या कानशिलात लगावली. या घटनेनंतर संपूर्ण रॅलीत खळबळ उडाली होती. आरोपीला मोतीनगर पोलीस ठाण्यात जेरबंद करण्यात आले आहे.

देश लोकसभा निवडणुकांच्या पाचव्या टप्प्याकडे वाटचाल करत आहे. तर, निवडणूका संपण्याच्या तारखाही जवळ येत आहेत. अशात दिल्लीमध्ये विविध पक्षांच्या प्रचाराला उधाण आले आहे. दरम्यान आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांचा मोतीनगर येथील कर्मपुरा येथे रोड-शो होता.

केजरीवाल जिपमध्ये उभे राहून हातवारे करत होते. त्यावेळी लाल टी-शर्टमध्ये एक व्यक्ती अचानक त्यांच्या गाडीवर चढला. काही समजण्यापूर्वीच त्याने केजरीवाल यांना मारले. त्यावेळी केजरीवाल यांचा तोलही गेला होता. मात्र, कर्यकर्त्यांच्या सहायाने ते गाडीतून पडण्यापासून वाचले.

केजरीवाल यांच्यावरील हल्ल्याचा व्हिडिओ

आरोपी हा कैलाश पार्क परिसरातील असून सुरेश, असे त्याचे नाव आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. सध्या त्याला मोतीनगर येथील पोलीस ठाण्यात आणले आहे.

यापूर्वीही केजरीवालांवर हल्ले -

यापूर्वीही अरविंद केजरीवाल यांच्यावर २०१४मध्ये निवडणूक प्रचाराच्या वेळी हल्ला झाला होता. त्यावेळी एका ऑटो चालकाने त्यांना मारले होते. त्यावेळी ते दिल्लीच्या सुल्तानपुरी येथे निवडणूक प्रचार करत होते. या हल्ल्यात त्यांच्या डोळ्यावर जखम झाली होती.

एवढेच नाही तर ४ एप्रिललाही दक्षिण दिल्ली परिसरात प्रचाराच्यावेळी त्यांच्या गळ्यात हार घालताना एका व्यक्तीने कानशिलात लगावली होती. त्यावेळी केजरीवाल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून या घटनेचा निषेध नोंदवला होता.

sample description
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.