ETV Bharat / bharat

लक्षणं न दिसणाऱ्या बालकांपासून कोरोना संसर्गाची शक्यता - आयसीएमआर - corona in children

मुलांमधील कोरोना संसर्गासंबंधीची पद्धतशीर माहिती जमा करण्याची गरज असल्याचे आयसीएमआरने अहवालात म्हटले आहे. अगलीकरणाचे मानसिक परिणाम, बंद शाळा, खेळावर आलेली बंधणे आणि मुलांवरील टाळेबंदीच्या परिणामांना समजून घ्यायला हवे, असे अहवालात म्हटले आहे.

file pic
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Aug 27, 2020, 8:18 PM IST

नवी दिल्ली - कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर लक्षणे न दिसणाऱ्या बालकांमुळे कोरोनाचा संसर्ग समाजात पसरण्याची शक्यता असल्याचे इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च संस्थेने(आयसीएमआर) आपल्या अहवालात म्हटले आहे. सौम्य लक्षणे असणाऱ्या बालकांची काळजी घरामध्ये राहूनही घेता येईल. मात्र, संसर्ग रोखण्यासाठीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे असल्याचे अभ्यासात म्हटले आहे.

ज्या बाधित मुलांना जास्त त्रास होत असेल, त्यांनाच आयसीयू आणि जीवनसंरक्षण प्रणालीवर ठेवण्याची गरज आहे. या अहवालात आयसीएमआरने मुलांमधील कोरोनाच्या प्रसाराबाबत अभ्यास केला आहे. बालकांवरील उपचार, संसर्ग निदान पद्धती, मुलांमधील वैशिष्ये, प्रसार रोखण्यासाठी आणि उपचाराचे व्यवस्थापन अशा घटकांचा आयसीएमआरकडून अभ्यास करण्यात आला.

श्वाच्छोश्वास आणि पोटासंबंधीच्या लक्षणाबरोबरच शरिरावर सूज आणि खाज येणे, चेतासंस्थासंबंधीची लक्षणे, शरिरांतर्गत सूज येण्यासारखी लक्षणे बालकांमध्ये आढळून येत आहेत. वयाने मोठे असणाऱ्या बालकांना जर इतर आजार असतील, तर त्यांना कोरोचा जास्त धोका असल्याचे अहवालात म्हटले आहे.

मुलांमधील कोरोना संसर्गासंबंधीची पद्धतशीर माहिती जमा करण्याची गरज असल्याचे आयसीएमआरने अहवालात म्हटले आहे. अगलीकरणाचे मानसिक परिणाम, बंद शाळा, खेळावर आलेली बंधणे आणि मुलांवरील टाळेबंदीच्या परिणामांना समजून घ्यायला हवे, असे अहवालात म्हटले आहे.

बालकांमध्ये कोरोनाची लक्षणे वेगवेगळ्या प्रकारे समोर येत असल्याचे दिसून आले आहे. संसर्ग झालेला असूनही लक्षणे नसणारी, सौम्य लक्षणे, मध्यम स्वरुपाची लक्षणे, तीव्र, अंत्यंत गंभीर लक्षणेही आढळून आली आहेत. तर काही मुलांचा मृत्यू झाल्याचेही समोर आले आहे. बहुसंख्य मुलांना सौम्य लक्षणे दिसून येत आहेत. सर्दी, चोंदलेले नाक, घशातील सूज मुलांमध्ये कमी प्रमाणात आढळून येत आहे. गंभीर लक्षणे असणाऱ्यांना श्वाच्छोश्वासासंबंधी समस्या निर्माण होऊ शकते. मळमळ, उलट्या आणि अतिसार ही लक्षणेही काही मुलांमध्ये दिसून आली असल्याचे अहवालात म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.