गुवाहाटी - आसाममधील २१ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती आहे. आतापर्यंत ६ जणांना प्राणांना मुकावे लागले आहे. ब्रह्मपुत्रा आणि तिच्या उपनद्यांना आलेल्या पुरामुळे मागील २४ तासांत धेमाजी, लखीमपूर, विश्वनाथ, सोनीपूर, डार्निंग, बस्का, बारपेटा, नालबरी, चिरंग, बोनगायगाव, गोलपारा, मोरीगाव, होजाई, नागाव, गोलाघाट, माजुली, जोरहाट, शिवसागर, दिब्रुगढ, तिन्सुकिया या गावांना फटका बसला आहे. आसाम राज्य आपत्तीनिवारण अधिकाऱ्यांनी हा अहवाल दिला आहे.
ब्रह्मपुत्रा नदी निमती घाट येथे धोक्याच्या पातळीच्या पुढे गेली आहे. तर, दिखोव, धनसिरी, जिया भराली, पुथीमारी आणि बेकी या नद्यांनीही धोक्याची पातळी ओलांडली आहे. रोंगानोडी जलविद्युत प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. याचे पाणी लखीमपूर येथे पसरत आहे.
मणि'पूर'