गुवाहटी (आसाम) - बुधवारी आसाम राज्यामध्ये महापुरात आणखी 7 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत जवळपास 26 जिल्ह्यातील 36 लोकांना पुराचा फटका बसला आहे. ही माहिती आसामच्या आपत्ती व्यावस्थापन विभागाने दिली आहे. मृत्यू झालेल्या व्यक्तींमधील 3 नागरिक हे मोरिगाव जिल्ह्यातील आहेत. तसेच बारपेटा जिल्ह्यात 2 तर सोनिटपूरसह गोलघाट जिल्ह्यातील प्रत्येकी एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे.
-
Our Govt is working on a war footing to provide all necessary assistance to the flood-affected people. District admin, @assampolice, SDRF, @NDRFHQ & other depts are rescuing the marooned people.
— Sarbananda Sonowal (@sarbanandsonwal) July 15, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Visited a flood relief camp at Teok & interacted with the inmates. pic.twitter.com/ZzwPNOrPxs
">Our Govt is working on a war footing to provide all necessary assistance to the flood-affected people. District admin, @assampolice, SDRF, @NDRFHQ & other depts are rescuing the marooned people.
— Sarbananda Sonowal (@sarbanandsonwal) July 15, 2020
Visited a flood relief camp at Teok & interacted with the inmates. pic.twitter.com/ZzwPNOrPxsOur Govt is working on a war footing to provide all necessary assistance to the flood-affected people. District admin, @assampolice, SDRF, @NDRFHQ & other depts are rescuing the marooned people.
— Sarbananda Sonowal (@sarbanandsonwal) July 15, 2020
Visited a flood relief camp at Teok & interacted with the inmates. pic.twitter.com/ZzwPNOrPxs
आतापर्यंत आसामध्ये 92 नागिरकांना महापुरामध्ये जीव गमवावा लागला आहे. यातील प्रत्यक्ष पुरात वाहून गेलेल्याची संख्या ही 66 आहे तर 26 लोकांचा भिंत किंवा जमिनीखाली दबून मृत्यू झाला आहे. दरवर्षी धोक्याची पातळी ओलांडणाऱ्या ब्रम्हपुत्रेने यंदाही आसाममध्ये हाहाकार माजवला आहे.
आसाममधील धुब्री जिह्याला महापुराचा सर्वात जास्त फटका बसला आहे. जवळपास साडेपाच लाख लोकांचे नुकसान झाले आहे. तसेच बारपेटा जिल्ह्यातील 5 लाख 30 हजार नागिरकांना पुराचा फटका बसला आहे. आसाम राज्यामध्ये आलेल्या प्रलयकारी पुराने जनजीवन तर विस्कळीत झालेच आहे. मात्र, त्याबरोबर काझीरंगा आणि पोबीतोरा वन्यप्राणी अभयारण्यतील प्राण्यांचे जीवही धोक्यात आले आहेत.
एनडीआरएफ आणि एसडीआरएफ पथकाने गेल्या 24 तासात 180 होड्यांच्या साहाय्याने जवळपास चार हजार नागरिकांना पुरापासून वाचवले आहे. मुख्यमंत्री सरबानंद सोनोवाल यांनी पूरसंबंधी मदतकेंद्रावर भेट देवून नागरिकांची विचारपूस केली.