मजुली - आसाममध्ये भयंकर पूरस्थिती आहे. याचा फटका ब्रह्मपुत्रा नदीजवळ वसलेल्या मजुली या शहराला बसला आहे. येथील नागरिकांसह वन्यप्राण्यांनाही पूर परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.
गावकऱ्यांच्या मदतीने फॉरेस्ट विभागाच्या कर्मचाऱ्यांनी चार हरिणींना बचावकार्य राबवून वाचवले. यानंतर त्यांना लखीमपूर येथील जंगलात सोडण्यात आले. याच नदीमध्ये जवळपास 150 हत्तींचा कळप अडकला आहे. पाण्याचा प्रवाह जोरदार असल्याने या हत्ताना नदी पार करणे अवघड झाले आहे.
आसाममध्ये आलेल्या पुरामुळे ब्रम्हपुत्रा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. राज्यातील २८ पैकी १८ जिल्हे पुराने प्रभावित झाले आहेत. पुरामुळे राज्यात आतापर्यंत ११ लोकांचा मृत्यू झाला असून तब्बल 26 लाख लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.