ETV Bharat / bharat

तुमच्या आई-वडिलांनी कधी शाळा कॉलेज बांधलंय का? नितीश कुमारांची आरजेडीवर टीका - बिहार निवडणूक बातमी

बेगुसराय जिल्ह्यात सार्वजनिक सभेला संबोधित करताना मुख्यमंत्री नितीश कुमारांनी राष्ट्रीय जनता दल पक्षावर हल्लाबोल केला. ज्यांना राज्य चालविण्याची संधी दिली त्यांनी काहीही केले नाही. फक्त अवैध मार्गाने पैसे कमविले, असे म्हणत त्यांनी लालू प्रसाद यादव आणि तेजस्वी यादव यांच्यावर निशाणा साधला.

नितीश कुमार
नितीश कुमार
author img

By

Published : Oct 24, 2020, 9:16 PM IST

पाटणा - बिहारमध्ये विधानसभा निवडणुका एका आठवड्यावर येऊन ठेपल्या आहेत. प्रचार शेवटच्या टप्प्यात आला असून राजकीय टोलेबाजी रंगात आली आहे. जनता दल युनायटेड पक्षाचे नेते आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी लालू प्रसाद यादव आणि तेजस्वी यादव यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. तुमच्या आई-वडिलांना विचारा त्यांनी सत्तेत असताना कधी शाळा, कॉलेज बांधले का? असा सवाल नितीश कुमारांनी केला.

चुकीचं काम केलं तर तुरुंगात जावं लागेल

बेगुसराय जिल्ह्यात सार्वजनिक सभेला संबोधित करताना त्यांनी राष्ट्रीय जनता दलावर हल्लाबोल केला. 'ज्यांना राज्य चालविण्याची संधी दिली त्यांनी काहीही केले नाही. फक्त अवैध मार्गाने पैसे कमाविले. तुरुंगात गेले आणि पत्नीला गादीवर बसविले. माझ्या सत्ताकाळात कोणी चुकीचं काम केलं तर त्याला थेट तुरुंगात जाव लागत आहे, असे म्हणत नितीश कुमारांनी स्वत:ची पाठ थोपटून घेतली. नितीश कुमारांनी आज साहेबपूर कमाल मतदार संघातही सभा घेतली. एनडीएला मतदान करण्याचे आवाहन त्यांनी जनतेला केले.

तीन टप्प्यात होणार मतदान

२४३ सदस्यांच्या बिहार विधानसभेसाठी तीन टप्प्यात निवडणूक होत आहे. २८ ऑक्टोबर, ३ नोव्हेंबर आणि ७ नोव्हेंबर रोजी मतदान होईल, तर मतमोजणी १० नोव्हेंबरला होईल. पहिल्या टप्प्यात २८ नोव्हेंबरला ७१ विधानसभा जागांसाठी मतदान होईल, तर दुसऱ्या टप्प्यात ३ नोव्हेंबरला ९४ जागांसाठी आणि शेवटच्या टप्प्यात ७ नोव्हेंबरला ७८ जागांसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीत, राजद काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या साथीने लढत असून भाजपा आणि जेडीयूसह इतर चार पक्ष त्यांच्या विरोधात निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.