ETV Bharat / bharat

बाबरी मशीद विध्वंस : मग त्या दिवशी जादूने मशीद पडली होती का? ओवेसी संतापले

author img

By

Published : Sep 30, 2020, 4:24 PM IST

Updated : Sep 30, 2020, 4:49 PM IST

अयोध्येमधील बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी तब्बल 28 वर्षांनंतर न्यायालयाने निकाल दिला. सीबीआयच्या विशेष न्यायालयाने या प्रकरणातील लालकृष्ण अडवाणी, मुरलीमनोहर जोशी यांच्यासह 32 आरोपींची निर्दोष मुक्तता आहे. निकालानंतर एमआयएमचे नेते आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

असदुद्दीन ओवेसी
असदुद्दीन ओवेसी

लखनऊ - अयोध्येमधील बाबरी मशीद विध्वंसप्रकरणी 28 वर्षांनंतर न्यायालयाने निकाल दिला. सीबीआयच्या विशेष न्यायालयाने या प्रकरणातील लालकृष्ण अडवाणी, मुरलीमनोहर जोशी यांच्यासह 32 आरोपींची निर्दोष मुक्तता केली. बाबरी मशीद पाडण्याचा पूर्वनियोजित कट नव्हता, असे निरक्षण न्यायालयाने नोंदविले. आरोपींविरोधात ठोस पुरावे नसल्याचे सांगत न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. या निकालानंतर एमआयएमचे नेते आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. मशीद ३२ जणांनी पाडली नाही तर, कुणी पाडली, असा सवाल त्यांनी केला आहे.

'हा न्यायाचा मुद्दा आहे. सीबीआय न्यायालायने दिलेला निकाल हा न्यायालयीन इतिहासातील काळा दिवस आहे. बाबरी विध्वंसाला जे कारणीभूत आहेत, त्यांना शिक्षा मिळण्याचा हा मुद्दा आहे. मात्र, त्यांना गृहमंत्री आणि मनुष्यबळ विकासमंत्री करून राजकीय बक्षीस देण्यास आले. या मुद्द्यामुळेच भाजपा सत्तेत आहे. भारतीय न्यायालयीन व्यवस्थेतील हा दु:खद दिवस आहे. आता न्यायालय म्हणत आहे, हे कारस्थान संगनमताने केलेले नाही'

'प्रत्येक जण आज दु:ख व्यक्त करेल. भारताच्या बहुविविधतेवर ज्यांचा विश्वास आहे, तो प्रत्येक जण आज मोडून पडेल. ६ डिसेंबरला जादूने मशीद पाडण्यात आली होती का? २८ आणि २९ डिसेंबरच्या रात्री जादूने तेथे मूर्ती नेऊन ठेवण्यात आल्या होत्या का? जादूने मशिदीचे कुलूप उघडण्यात आले होते का? सर्वोच्च न्यायालयाने जे म्हटले, त्याच्या विरोधात हा निकाल आला आहे. लालकृष्ण आडवाणी यांची रथयात्रा भारतात जेथे कुठे गेली तेथे हिंसा झाली, अनेकांची घरे जाळण्यात आली, नागरिकांचा मृत्यू झाला, असे ते म्हणाले

'एक धक्का और दो, बाबरी मस्जिद तोड दो', अशी घोषणा उमा भारती यांनी दिली होती, हे खरे नाही का? बाबरी मशीद पाडण्यात आली तेव्हा, मिठाई वाटण्यात आली, हे जगाने पाहिले. सगळे नेते तेव्हा आनंद व्यक्त करत होते. यातून काय संदेश जात आहे. तुम्ही हिंसा केली तर, तुम्हाला हवे ते मिळेल. १९५०पासून आत्तापर्यंत मुस्लिमांना न्याय मिळालेला नाही. मशीद पाडली नसती, ९ नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला असता का? हा प्रश्न मी आजही विचारतो. त्यावेळच्या अनेक नेत्यांनी आणि पत्रकारांनी मशिदीवरील हल्ला पूर्वनियोजित असल्याचे म्हटले होते. मात्र, तरीही सर्व आरोपींना सुट देण्यात आली, असे ओवेसी म्हणाले.

Last Updated : Sep 30, 2020, 4:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.