ETV Bharat / bharat

आरोग्यमंत्र्यांशी चर्चा निष्फळ, हैदराबादमध्ये डॉक्टरांचे आंदोलन सुरूच - हैदराबाद डॉक्टरांचा संप न्यूज

कोरोना रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरवर हल्ला केल्यानंतर कनिष्ठ डॉक्टरांनी मंगळवारी रात्रीपासून निषेध आंदोलन सुरू केले आहे.

 हैदराबाद गांधी रुग्णालय न्यूज
हैदराबाद गांधी रुग्णालय न्यूज
author img

By

Published : Jun 11, 2020, 4:44 PM IST

हैदराबाद - शहरातील राज्य शासकीय गांधी रुग्णालयाच्या कनिष्ठ डॉक्टरांनी गुरुवारीही संप सुरू ठेवला आहे. राज्याचे आरोग्यमंत्री इटाला राजेंदर यांच्याशी बोलल्यानंतरही काहीच फायदा न झाल्याने आंदोलन सुरू ठेवण्यात आले आहे. कोरोना रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरवर हल्ला केल्यानंतर कनिष्ठ डॉक्टरांनी मंगळवारी रात्रीपासून निषेध आंदोलन सुरू केले.

आज तेलंगणा कनिष्ठ डॉक्टर असोसिएशनने (टीजेयुडीए) रुग्णालय अधीक्षकांना पत्र लिहून त्यांचा संप कायम राहील, अशी घोषणा केली. हैदराबादमधील गांधी हॉस्पिटल हे राज्यातील एकमेव सरकारी रुग्णालय आहे, जिथे कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केले जात आहेत. त्यामुळे येथे डॉक्टरांवर ताण येत असून राज्यातील इतर रुग्णालयांमध्ये देखील रुग्णांना दाखल करून घ्यावे, अशी डॉक्टरांची इच्छा आहे.

आरोग्यमंत्री राजेंदर बुधवारी गांधी हॉस्पिटलमध्ये आंदोलनकर्त्या डॉक्टरांशी चर्चेसाठी आले होते. कनिष्ठ डॉक्टरांशी तब्बल चार तास त्यांनी चर्चा केली. त्यानंतर आपण दर आठवड्याला डॉक्टरांच्या प्रतिनिधींना रुग्णालयात भेटू आणि त्यांच्या सर्व समस्या सोडवू, असे ते म्हणाले. त्यांच्या आश्वासनानंतरही कनिष्ठ डॉक्टरांनी आपले आंदोलन कायम ठेवले आहे.

मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून कोरोना उपचारांसाठी विकेंद्रीकरण करण्याचा निर्णय जाहीर केला जाईल, असे राजेंद्र यांनी सांगितले. मात्र, ती आमची मुख्य मागणी नसल्याचे डॉक्टर संघटनेचे म्हणणे आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.