नवी दिल्ली - विधानसभा निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी पहिल्यांदा दिल्लीकरांना संबोधित केले. हा विजय माझा नसून दिल्लीकरांचा आहे. तसेच, या निवडणुकांनी नव्या विचारांच्या राजकारणाला सुरुवात झाली आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
ज्या दिल्लीकरांना २४ तास वीज, चांगले शिक्षण, पाणी, आरोग्य सेवा आणि शाळा मिळाल्या त्या प्रत्येक कुटुंबाचा हा विजय आहे, असे ते म्हणाले. केजरीवाल यांनी सर्व दिल्लीकर आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले. तसेच कुटुंबानी सहकार्य केल्याबद्दल त्यांचेही आभार मानले. आज आपल्या पत्नीचा वाढदिवस असल्याचा उल्लेखही त्यांनी यावेळी केला.
हनुमानाचे आशिर्वाद घेत मनोज तिवारींना मारला टोला..
आज मंगळवार, म्हणजेच हनुमानाचा वार आहे. त्यांनी आम्हाला दिशा दाखवावी. शक्ती द्यावी, अशी प्रार्थना त्यांनी हनुमान चरणी केली. यातून त्यांनी भाजपचे दिल्ली अध्यक्ष मनोज तिवारी यांना टोला लगावला. अरविंद केजरीवाल यांनी हनुमानजींचे मंदिर अशुद्ध केल्याचा आरोप तिवारी यांनी केला होता.