शहादनगर - तेलंगणीमधील शहादनगर जिल्हा पोलीस आयुक्त आणि सायबर पोलीस स्पेशल टीमने संयुक्त ऑपरेशन करत आंतरराज्य चोरी करणाऱ्या टोळीला पकडले आहे. तब्बल 7 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. दशमेशधाबा येथील चोरी प्रकरणी त्यांना अटक केली आहे. २ कोटी ८९ लाख ३३ हजार आठशे एवढी निव्वळ रोख रक्कम त्याच्याकडून जप्त करण्यात आली आहे. तसेच 350 ग्रॅम सोने, एक पिस्तूल आणि एक मारुती कार देखील त्यांच्याकडून जप्त करण्यात आली आहे.
भोसले विश्वजीत चंद्रकांत, (रा. कराड), मयुरेश मनोहर पिसाळ (रा.भिवंडी), सुजाता रमेश घारे, (रा.ठाणे), आकाश कांबळे (रा.सातारा), सनी चव्हाण (रा.सातारा), आकाश दीपक राठोड (रा. ठाणे), सुनिता चंद्रकांत भोसले (रा.सातारा) अशी आरोपींची नावे आहेत. यामध्ये दोन महिलांचा देखील समावेश आहे.