पुणे- दक्षिण भारतामध्ये दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता भारतीय लष्कराने व्यक्त केली आहे. हल्ल्याबाबतची माहिती लष्कराला मिळाली असल्याचे लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे कमांडिग ऑफिसर, लेफ्टनंट जनरल एस. के सैनी यांनी दिली. पुण्यातील कान्हे येथे लष्कराच्या लॉ कॉलेज येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
गुजरात येथील सर क्रिक खाडीजवळ अज्ञात बोटीही आढळून आल्या आहेत. त्यामुळे सुरक्षा व्यवस्था वाढवण्याच्या दृष्टीकोणातून उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. तसेच किनाऱ्यावरील हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे ते म्हणाले.
हेही वाचा- पाकिस्तानला 1971 पेक्षाही अधिक जबरदस्त धडा शिकवू - लेफ्टनंट जनरल धिल्लाँ
पाकिस्तानी लष्कराचे विषेश पथक गुजरात जवळील सर क्रिक खाडी येथे असल्याची माहिती भारतीय लष्कराला मिळाली आहे. भारतामध्ये हिंसाचार घडवण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न आहे. पाकिस्तानकडून असलेल्या धोक्याबाबत सैनी यांना विचारले असता या मुद्द्याला अनेक पैलू असल्याचे ते म्हणाले. मात्र, दहशतवाद्यांचा सामना करण्यासाठी भारताची रणनिती स्पष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.
सुरक्षेसंबधी प्रत्येक मुद्द्याचा तसेच संघर्षाचा सरकार सखोल आभ्यास करत असल्याचेही ते म्हणाले. राजकीय, आर्थिक, सामाजिक तसेच राजनैतिक मार्गाद्वारे सोडवण्याचा प्रयत्न करत असतो, असे ते म्हणाले.
हेही वाचा- पाकिस्तानजवळ 125-250 ग्रॅमचे अणुबॉम्ब; पाकिस्तानी रेल्वेमंत्र्याचा खुलासा