नवी दिल्ली - गुरुवारी उत्तर सिक्कीमच्या डोंगराळ भागात हिमस्खलनामध्ये लेफ्टनंट कर्नल आणि एक सैनिक ठार झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. शुक्रवारी सकाळी 11:30 वाजता मुगुथांग येथील परिसरात घटना घडली.
18 जणांची टीम टीम बर्फ हटवण्याचे काम करत होती. तेव्हा हिमस्खलन झाल्याने दोन जवानांचा मृत्यू झाला. यापूर्वी 11 एप्रिललाही हिमस्खलनामुळे एकाचा मृत्यू झाला होता.
हिमस्खलनात अडकलेल्या जवानांच्या बचावकार्यासाठी लष्कराने सर्वोत्तम प्रयत्न केले. मात्र, लेफ्टनंट कर्नल रॉबर्ट टीए आणि सैनिक सपेर सपला शनमुख राव यांचा मृत्यू झाला. गटातील बाकीचे सदस्य सुरक्षित असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.