ETV Bharat / bharat

चकमक करणाऱ्या दहशतवाद्याला शरण येण्याचे सैनिकाकडून आवाहन, नंतर असे घडले नाट्य...

author img

By

Published : Oct 17, 2020, 2:15 AM IST

दहशतवादी गटात नुकतेच सामील झालेला दहशतवादी हा एके-४७ रायफलीसह भारतीय सैनिकाला शरण आला आहे. हा नाट्यमय व्हिडिओ सैन्यदलाने जाहीर केला आहे.

दहशतवाद्याला शरण येण्याचे आवाहन करताना सैनिक

श्रीनगर - सैन्यदलाच्या आवाहनानंतर दहशतवादी एके-४७ रायफलसह हा शरण आल्याचा व्हिडिओ सैन्यदलाने जाहीर केला आहे. सैन्यदलाबरोबर चकमक झाल्यानंतर या शरण आलेल्या दहशतवाद्याला भारतीय सैनिकाकडून अभय दिल्याचे दिसत आहे. जहांगीर भट असे शरण आलेल्या दहशतवाद्याचे नाव आहे.

जम्मू आणि काश्मीरमधील भरकटलेला तरुण काही दिवसांपूर्वी दहशतवादी गटात सामील झाला होता.

चकमक करणाऱ्या दहशतवाद्याला शरण येण्याचे सैनिकाकडून आवाहन

असे घडले दहशतवादी शरण येण्याचे नाट्य

सैन्यदलाने जाहीर केलेल्या व्हिडिओत हा दहशतवादी हातात रायफल घेतल्याचे दिसत आहे. सैनिकांकडून जहांगीर भट या दहशतवाद्याला शरण येण्याचे आवाहन करण्यात आले. हात वर करून सैनिकाकडे येणाऱ्या दहशतवाद्याला कोणतीही इजा होऊ देणार नाही, असा सैनिकाने दिलासा दिला. तुला काहीही होणार नाही, असे सैनिक या दहशतवाद्याला सांगून शरण येण्याचे आवाहन करताना व्हिडिओत दिसत आहे. हा दहशतवादी सैन्यदलाला शरण आल्यानंतर त्याच्या काकांनी सैन्यदलाचे आभार मानले आहेत. पुन्हा त्याला दहशतवादी गटात जाऊ देऊ नका, अशी विनंती सैन्यदलाने दहशतवाद्याच्या काकाला केली आहे.

याबाबत माहिती देताना सैन्यदलाने म्हटले, की जहांगीर अहमद भट हा छादूरामधून हरवला होता. त्याच्या कुटुंबीयांनी जहांगीरचा शोध घेऊनही तो सापडला नाही. शुक्रवारी सकाळी सैन्यदलाने शोधमोहिम राबविली असता जहांगीरचा सुगावा लागला. सैन्यदलाच्या आचारसंहितेप्रमाणे या दहशतवाद्याला शरण येण्याचे आव्हान करण्यात आले. त्यानंतर हा दहशतवादी अखेर सैन्यदलाला शरण आला.

दहशतवादी गटात तरुणांची भरती होऊ नये, यासाठी भारतीय सैन्यदलाकडून प्रयत्न करण्यात येतात. जर तरुण दहशतवादी गटात सामील झाला तर आम्ही त्याला परत येण्याचा पर्याय देतो, असे सैन्यदलाने म्हटले आहे. याबाबत सैन्यदलाच्या प्रवक्ते कर्नल राजेश कालिया ईटीव्ही भारतशी फोनवरून बोलताना म्हटले, की हे काश्मीरमधील दुर्मीळपैकी दुर्मीळ दहशतवादाविरोधातील कारवाई आहे. प्रत्येक दहशतवादविरोधातील मोहिमेत सैन्यदलाकडून व्यावसायिकता दाखविण्यात येते. ही घटना सैन्यदलाच्या दृष्टीकोनाचे छोटेसे उदाहरण आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.