ETV Bharat / bharat

'शेवटची निवडणूक' असे आवाहन म्हणजे नितीशकुमारांची अपयशाची दया याचिका- चिदंबरम - मुख्यमंत्री नितीशकुमार

कॉंग्रेसचे नेते पी. चिदंबरम यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर टीका केली. नितीशकुमार यांनी पराभवाची कबुली दिल्याचे चिदंबरम म्हणाले.

Congress leader P. Chidambaram
कॉंग्रेस नेते पी. चिदंबरम
author img

By

Published : Nov 6, 2020, 9:48 AM IST

नवी दिल्ली - बिहार विधानसभा निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री नितीश कुमारांनी बिहारी जनतेला भावनिक साद घातली. 'ही माझी शेवटची निवडणूक आहे', असे भावनिक आवाहन नितीश यांनी केले आहे. दरम्यान, कॉंग्रेसचे नेते पी. चिदंबरम यांनी नितीश यांच्यावर टिका केली आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी पराभव स्वीकारल्याचे चिदंबरम म्हणाले.

पी. चिदंबरम म्हणाले, नितीशकुमार यांनी जेव्हा त्यांची ही शेवटची निवडणूक असल्याचे जाहीर केले तेव्हा त्यांनी पराभवाची कबुली दिली. 'शेवटची निवडणूक' ही त्यांचे पाठिंबा देण्याचे आवाहन नाही. तर त्यांच्या अपयशाची दया याचिका आहे. ते जर निवडून आले तर पहिल्या दिवसापासून सुस्त होतील. अशा व्यक्तीला बिहारच्या लोकांनी मतदान का करावे?, असा प्रश्न चिदंबरम यांनी उपस्थीत केला आहे.

काय म्हणाले होते नितीश कुमार?

'निवडणूक प्रचाराचा आज शेवट होणार आहे. परवा मतदान होत आहे. ही माझी शेवटची निवडणूक आहे. अंत भला तो सब भला', अशा शब्दांत नितीश यांनी जनतेला भावनिक आवाहन केले. नितीश यांनी १९७७ साली आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. त्यांनी नालंदाच्या हरनौत येथून राजकारणात प्रवेश केला होता. नितीश यांनी या मतदारसंघातून चारवेळा निवडणूक लढवली होती. यात त्यांना १९७७ आणि १९८० साली पराभव स्वीकारावा लागला होता.

रणदीपसिंग सुरजेवाला यांनी देखील केली टिका

आज आपली शेवटची निवडणूक असल्याचे प्रचाराच्या शेवटच्या दिवशी नितीशकुमार यांनी ज्या प्रकारे विधान केले. त्यावरून बिहारमधील भाजपा-जेडीयू आघाडीने पराभव स्वीकारला हे स्पष्ट झाले. आम्ही सुरुवातीपासूनच म्हणत आलो आहोत, की बिहारमधील जनतेला बदल हवा आहे. बिहारमध्ये एक महायुती सरकार स्थापन होईल, हे त्यांनी निश्चितपणे स्वीकारले आहे, असे काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस रणदीपसिंग सुरजेवाला म्हणाले.

हेही वाचा- नितीश कुमारांच्या भावनिक अस्त्रांवर विरोधकांची टीका, वाचा कोण काय म्हणाले...

हेही वाचा- आता झारखंडमध्येही सीबीआयला 'नो एंट्री'; महाराष्ट्रानंतर सोरेन सरकारचा निर्णय

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.