विशाखापट्टणम - आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी हे आपल्या राज्याचे पूर्व मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्यावर सूड उगवत आहेत, असा आरोप भाजपचे राज्यसभा खासदार व माजी केंद्रीय मंत्री सृजना चौधरी यांनी केला आहे.
सृजना चौधरी यांनी जगनमोहन रेड्डी यांना राज्याच्या कारभारावर लक्ष केंद्रीत करून लोकांच्या समस्या सोडवण्याच्या दिशेने काम करण्याची सूचना केली आहे.
मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी सत्तेचा दुरूपयोग करत आहेत - सृजना चौधरी
"विरोधी पक्षनेते चंद्राबाबू नायडू यांच्यावर सूड घेण्यासाठी वायएसआर सरकारचे मुख्यमंत्री सत्तेचा दुरूपयोग करीत आहे", असा आरोप सृजना चौधरी यांनी केला आहे.
"जगन यांनी आपले वैयक्तिक वैमनस्य सोडून द्यावे आणि राज्य सरकारच्या कामकाजाकडे लक्ष दिले पाहिजे", असे चौधरी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.
पूरग्रस्तांवर दुर्लक्ष केल्याचा चौधरी यांचा आरोप
जगनमोहन सरकार पूरग्रस्तांकडे दुर्लक्ष करत आहे. पूर नियंत्रण व मदतीच्या उपाययोजना कशा राबवायला हवे, हे सरकारला माहित नाही., असा आरोप चौधरी यांनी केला आहे.