अमरावती - आंध्र प्रदेशच्या काकारापाडू गावात गुरे घेऊन जाणाऱ्या एका ट्रकचा अपघात झाला. ट्रकमध्ये एकूण ४० जनावरे नेली जात होती. संपूर्ण ट्रकच पलटी झाल्यामुळे त्यापैकी ३० जनावरांचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. तर, १० जनावरे जखमी आहेत.
जनावरांची अवैध तस्करी करण्यासाठी म्हणून साधारणपणे रात्री अशाप्रकारे जनावरांची वाहतूक केली जाते. अपघातानंतर ट्रकचालक पळून गेल्यामुळे, या घटनेतही असाच प्रकार झाला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विशेष म्हणजे, दुर्घटनेनंतर आजूबाजूच्या परिसरातील लोकांनी जखमी जनावरांना पळवून नेले आहे.
हेही वाचा : वन्य हत्ती विरुद्ध माणूस संघर्ष : आसाममधील 'या' तरुणाने शोधला अनोखा उपाय... आता हत्तीही खूश आणि शेतकरीही!