कोटा - शुक्रवारी भीमगंजमंडी ठाणे क्षेत्रातील आरोग्य पथक कोरोनाची चाचणी करण्यासाठी स्टेशन परिसरात पोहोचले. यावेळी एक वृद्ध महिला आपल्या मुलाच्या खांद्यावर बसून कोरोनाच्या चाचणीसाठी आली. या महिलेची जिद्द आपल्याला कोरोनाशी लढणाऱ्या सर्व व्यवस्थेला सर्व मदत करण्याची प्रेरणा देते.
या प्रदेशात कोरोनाचे संक्रमण वाढत आहे. मात्र, आरोग्य विभाग दिवस-रात्र रुग्णांचे नमुने घेत आहे. लोक आरोग्य यंत्रणेला सहाय्य करत नसल्याच्या बातम्या समोर येत आहेत. लोक नमुने देण्यासाठी घाबरत आहेत. आशा स्थितीत कोरोनाशी लढणे आरोग्य यंत्रणेला कठीण जात आहे. यातच कोटा जिल्ह्यातील महिलेने कोरोनाविषयी जागरूकतेचे एक आदर्श उदाहरण ठेवले आहे.
भीमगंजमंडी ठाणे क्षेत्रातील माला रोड परिसरात नमुने घेण्यासाठी आरोग्य विभागाचे पथक पोहचले होते. यावेळी नमुना देण्यासाठी 70 वर्षाच्या वृद्ध महिला गंगाबाई किशनलाल सहरिया आपल्या मुलाच्या खांद्यावर बसून आल्या. या वृद्ध महिलेने आपल्या कोरोना तपासनीसाठी नमुने देन्याची मागणी केली. वृद्ध महिलेचा हा विश्वास करोनाच्या लढाईत पुढे येऊन लढण्याचा संदेश देत आहे. भीमगंजमंडी पोलीस ठाण्याचा प्रयत्न आहे, की त्याच्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व लोकांचे नमुने घेतले जावेत, ज्यामुळे कोरोना रोगावर अंकुश ठेवण्यात येईल.
भीमगंजमंडी ठाण्याच्या अधिकारी हर्षराज सिंह खरेडा यांनी आवाहन केले आहे. ज्यांना कोरोना संक्रमणाची लक्षणे ताप, सर्दी, खोकला, श्वास घ्यायला त्रास असतील तर त्यांनी लगेच आपली तपासणी करावी. त्यांच्या बरोबर त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला या रोगामुळे धोका आाहे.