ETV Bharat / bharat

एक विवाह असाही...यूपी-उत्तराखंड बॉर्डरवरच पार पडले लग्न

अरिवंद ने तडकाफडकी वधू छायाच्या घरच्यांना फोन लावला आणि परिस्थितीबाबत सांगितले. यावर वर-वधूच्या घरच्यांनी चर्चा करून अजबच तोडगा काढला. छायाने आपले कुटुंब व पुजाऱ्यासह आणि अरविंदनेही आपले कुटुंब व पुजाऱ्यासह उत्तराखंड सीमेवरील धर्मापूर पोलीस चौकी गाठली व तेथे लग्न केले.

Lockdown wedding
प्रतिकात्मक
author img

By

Published : May 4, 2020, 2:38 PM IST

बिजनोर (यू.पी)- देशात सर्वत्र लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे, सोशल डिस्टन्सिंग राखण्यासाठी लग्न संमारंभांना प्रशासनाकडून परवानगी नकारण्यात येत आहे. त्यामुळे, मोजक्या नातेवाईकांसह विवाह इच्छुक युवक-यवती घरात लग्न करताना दिसून येत आहे. मात्र, बिजनोरमधील एका युवकाने चक्क उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशच्या सीमेवर आपला विवाह संपन्न केला आहे.

अरविंद कुमार (वय.२८) असे नवरदेव मुलाचे नाव असून त्यानी उत्तराखंड येथील छाया राणी (वय.२५) हिच्याशी लग्न केले आहे. अरविंद हा उत्तर प्रदेशमधील बिजनोर जिल्ह्यातील रेड झोन असलेल्या रेहर भागात वास्तव्यास आहे, तर छाया ही उत्तराखंडमधील ग्रीन झोन असलेल्या उधम सिंह नगरच्या जसपूर भागात वास्तव्यास आहे. शनिवारी अरविंद हा छाया हिच्याशी लग्न करण्यासाठी रेहरवरून जसपूरच्या दिशेने निघाला होता. यासाठी अरविंदने जिल्हा प्रशासनाकडून पास देखील मिळवली होती. मात्र, वाटेत बिजनोर सिमेवर पोलिसांनी त्याला अडवले. कोरोनामुळे राज्याच्या सीमा बंद करण्यात आल्या आहे, तसेच रेड झोनमधील व्यक्ती ही ग्रीनझोनमध्ये प्रवेश करू शकत नाही, असे पोलिसांनी अरविंदला सांगितले. अरिवंद ने तडकाफडकी वधू छायाच्या घरच्यांना फोन लावला आणि त्यांना परिस्थितीबाबत सांगितले. यावर वर-वधूच्या घरच्यांनी चर्चा करून अजबच तोडगा काढला. छायाने आपले कुटुंब व पुजाऱ्यासह आणि अरविंदनेही आपले कुटुंब व पुजाऱ्यासह उत्तराखंड सीमेवरील धर्मापूर पोलीस चौकी गाठली व तेथे लग्न केले.

यावर पोलिसांनी आम्हाला उत्तराखंड राज्यात प्रवेश करू दिला नाही. मात्र, पोलिसांचे मन वळवल्यानंतर त्यांनी आम्हाला सीमा परिसरात लग्न करण्याची परवानगी दिली. त्याचबरोबर, त्यांनी आम्हाला धर्मापूर पोलीस चौकीत लग्न करण्यास मदत देखील केली, असे अरविंद याने सांगितले. तर अरविंद हा मनियाला गावाच्या जवळपास रहातो. या गावात २ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत, त्यामुळे आम्ही त्याला राज्यात प्रवेश करू दिला नाही. मात्र, नंतर आम्ही वराच्या कुटुंबांला सीमा भागात प्रवेश करण्याची परवानगी दिली, असे धर्मापूर पोलीस चौकीचे प्रभारी जी.डी भट्ट यांनी सांगितले. दरम्यान, विवाहानंतर अरविंद आणि छाया या दोघांच्या अनोख्या विवाहाची दोन्ही राज्यात चर्चा सुरू आहे.

हेही वाचा- पहिला लाभार्थी 'मीच', मद्य मिळवण्यासाठी तळीरामांमध्ये चढाओढ.. मद्यविक्री दुकानांसमोर रांगा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.