आम आदमी पार्टीने सामान्य मतदाराला काय हवे आहे, हे अचूक ओळखले आणि त्यांना आकर्षित करण्यासाठी त्यानुसार योग्य लोकप्रिय योजना तयार केल्या. निवडणुकीतील विजय आणि पराभव काहीही होओ, सर्व राजकीय पक्ष लोकप्रिय घोषणांच्या मार्गाने प्रचाराला सुरवात करतात.
लोकसंख्येच्या काही विशिष्ट घटकांना करांच्या पैशातून मोफत सवलतींची खैरात करण्यात येत असल्याबद्दल समाजाच्या विविध स्तरांतून जोरदार टीका केली जात आहे. तरीही, आप त्याच्या कल्याणकारी योजनांचे समर्थन करत आहे. काही दशकांपूर्वी, काँग्रेस पक्षाने लोकांच्या मूलभूत गरजांचा उल्लेख करत रोटी कपडा और मकान ही घोषणा दिली होती. अरविंद केजरीवालप्रणित आप पक्षाने विज, महामार्ग आणि पेयजल(बिजली,सडक और पानी) यांचा त्या यादीत समावेश केला आहे.
२०१५ च्या विधानसभा निवडणुकीत, आपने दिल्लीकरांच्या आर्थिक स्थितीविषयक एक विस्तृत पहाणी केली होती. या पहाणीत असे उघड झाले होते की, दिल्लीची १० टक्के लोकसंख्या, जी अंदाजे १७ लाख आहे, दर महिन्याला १० हजाराहून कमी कमवते. २० टक्के लोकसंख्या १० हजार ते ३० हजार रूपये कमावते. म्हणून, आपने पेयजलाचा आकार निम्म्यावर आणण्याची घोषणा केली आणि विनामूल्य वीज आणि महिला प्रवाशांना तिकीटाशिवाय मोफत प्रवासाचे वचन दिले.
त्यानंतरच्या निवडणुकीत, पक्ष ७० पैकी ६७ जागा जिंकू शकला होता आणि त्याने आपल्या निवडणुकीत दिलेली वचने पाळली. चारशे मोहल्ला क्लिनिक हे प्रत्येकी १२ हजार लोकसंख्येसाठी एक प्रचंड यशस्वी झाले आहेत. दिल्लीच्या सुरक्षेच्या स्थितीवर होणाऱ्या टीकेपासून दूर राहण्यासाठी, दिल्ली परिवहन बसमध्ये सुरक्षा दले उपलब्ध केली आहेत.
या निर्णयामुळे महिलावर्गात सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. मोफत परिवहन उपायामुळे, महिला दरमहा बाराशे ते अठराशे रूपये वाचवण्यास सक्षम ठरत आहेत. पेयजलावरील कर निम्म्याने घटवून आणि २०० युनिटपेक्षा कमी विजवापर असलेल्या परिवारांना मोफत विज देण्यामुळे आपने लोकांचा विश्वास जिंकला आहे.
अल्प आणि मध्यम उत्पन्न गटांनी, २०१९ च्या लोकसभा निवडणुकी भाजपला पाठिंबा दिला होता. त्यांनी आता आपला मतदान केले आहे. हे दोन गट मिळून दिल्लीच्या एकूण लोकसंख्येपैकी पन्नास टक्के लोकसंख्या बनते. निवडणुकीनंतरच्या अनुभवानंतर, आपने यावेळी उदात्त योजना आणली आहे. महिला सार्वजनिक परिवहन व्यवस्थेत विनामूल्य प्रवास करू शकतील, असे आपने जाहीर केले.
या लोकप्रिय घोषणेने आपला राजकीय फायदा झाला असला तरीही, त्यामुळे करदात्यांवर अधिक बोजा पडणार आहे. पण आप नेत्यांनी लगेच या योजनेचे समर्थन केले. लक्ष्यित लोकसंख्या जेव्हा खूप गरिब असते आणि अल्प उत्पन्न गट असतात, तेव्हा अशा मोफत सवलतीच्या योजना योग्य ठरतात. याहीपुढे, आपचा असा विश्वास आहे की, स्वातंत्र्यानंतर सात दशके जो विषम विकास झाला आहे, तो दुरूस्त करण्याचा हाच एक मार्ग आहे.