ETV Bharat / bharat

मातीची धूप रोखणे अत्यंत आवश्यक...

२०१३ पासून संयुक्त राष्ट्रसंघ प्रत्येक डिसेंबरमध्ये जागतिक वसुंधरा दिन साजरा करत असतो. यावर्षी मातीची धूप होण्यास आळा घालून पृथ्वीतलावरील मानवजात आणि सजीवांचे संरक्षण करण्याच्या घोषणेवर काम करत आहे.

मातीची धूप रोखणे अत्यंत आवश्यक
मातीची धूप रोखणे अत्यंत आवश्यक
author img

By

Published : Dec 6, 2019, 2:44 PM IST

मानवी जीवनात पृथ्वी अत्यंत महत्वाची भूमिका बजावत असते. ती मानव, प्राणी आणि पक्ष्यांना अन्न पुरवते. सुपीक जमिनी अधिक अन्नधान्य उत्पादित करण्यास मदत करतात. अनेक कारणांमुळे त्यांची सकसतेची शक्ती हरवत चालली आहे. मातीची धूप हे त्यापैकी एक कारण आहे, त्यामुळे समस्या निर्माण होत आहे.

२०१३ पासून संयुक्त राष्ट्रसंघ प्रत्येक डिसेंबरमध्ये जागतिक वसुंधरा दिन साजरा करत असतो. यावर्षी मातीची धूप होण्यास आळा घालून पृथ्वीतलावरील मानवजात आणि सजीवांचे संरक्षण करण्याच्या घोषणेवर काम करत आहे. जगभरातच मातीची धूप होण्याचा भूस्खलन आणि मानवजातीच्या प्रगतीवर विपरित परिणाम होत आहे.

आंतरराष्ट्रीय अन्न, कृषी संघटनेचे संचालक, प्राध्यापक मारिया सलिना अमेंडो यांनी केलेल्या टिप्पणीत प्रचलित परिस्थितीचे प्रतिबिंब उमटले असून अनेक देशांतील सरकारांनी मातीची धूप होण्यास आळा घालण्यासाठी परिणामकारक योजना अमलात आणण्यांची गरज आहे.

अनेक प्रकारांनी नुकसान सुपीक जमिनी आवश्यक असून अनेक देशांतील लोकांच्या आरोग्याचा पाया आहे, यात काही शंका नाही. मानवी विकास आणि प्रगतीची गुरूकिल्ली जमिनींचे आरोग्य आहे, कारण योग्य लागवडीच्या माध्यमातून त्या दर्जेदार धान्य निर्माण करतात.

पृथ्वीपासून आपल्याला ९५ टक्के अन्नधान्य आणि ९९.९ टक्के पाणी मिळते. ती मातीमध्ये कार्बनचे स्थिरीकरण करते, प्रदूषण कमी करते आणि पिके, जंगले यांना पाणी तसेच पोषक द्रव्ये पुरवते तसेच अन्नधान्य, कपडे, लाकूड आणि औषधे यांच्या उत्पादनास सहाय्य् करते.

भारतासह संपूर्ण जगभरात मातीच वापर अंदाधुंदपणे आणि धोकादायकरित्या होत आहे. रसायने, खते, कीटकनाशके यांचा बेछूट वापर आणि अनावश्यक भराव टाकणे आणि अशास्त्रीय पाण्याचे व्यवस्थापन आणि लागवड यामुळे माती प्रदूषित होते. याचा परिणाम जमिनीचा कस कमी होणे, अन्नधान्य उत्पादनात घट, धूप झाल्याने वाऱ्याच्या परिणामी वरचा अत्यंत बहुमोल असा थर आणि पाणी वाहून जाणे यामध्ये होतो.

आंतरराष्ट्रीय अभ्यासात असे उघड झाले आहे की, खराब लागवड करण्याच्या सवयींमुळे मोठ्या प्रमाणावर मातीची धूप होते. केंद्रीय मृदा आणि जल संरक्षण संघटनेने असे म्हटले आहे, की, ८.२६ कोटी हेक्टर मातीचा वरचा थर निघून गेला आहे. दरवर्षी ५३३४ टन सुपीक जमिन आणि ८४ लाख टन पोषक द्रव्ये वाहून जात असून त्यामुळे उत्पादकता आणि क्षमतेत घट होत आहे.

अन्न आणि कृषी संघटनेच्या(एएफओ) अंदाजानुसार, आज मातीची धूप होण्याचे जे प्रमाण ३० टक्के आहे, ते २०५० पर्यंत ९० टक्क्यांपर्यंत वाढणार आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने मातीची धूप होण्यामुळे अन्नधान्याबाबतीत पेचप्रसंग निर्माण होणार आहे तसेच ग्रामीण गरिबांच्या आर्थिक स्थितीवर परिणाम होऊन दुष्काळामुळे उपजीविकेसाठी स्थलांतर होण्याला चालना मिळेल, असा इषारा दिला आहे.

जगभरात मातीची धूप होण्याचा प्रकार सुरूच राहिल्यास त्यामुळे अन्नसुरक्षेची समस्या निर्माण होणार आहे. कारण मातीची धूप झाल्याने पाणी आणि हवा मातीच्या खालच्या थरापर्यंत जाण्यापासून रोखले जाते आणि मुळांची वाढ खुंटते. मातीची धूप अन्नधान्य उत्पादनात ५० टक्के घट घडवू शकते.

हरित क्रांतीचे पिता स्वामीनाथन यांनी असे मत व्यक्त केले आहे की, सुमार दर्जाची पोषक द्रव्ये असलेल्या मातीमध्ये पिकांची लागवड केल्यास जे धान्य उत्पादन होईल त्याचा दर्जा सुमार असतो जसे की, त्यात जस्ताचे प्रमाण नसतेच. तसेच,असे धान्य सेवन केल्यास लोकांना आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील, असे त्यांनी म्हटले आहे.

एक इंच रुंदीची माती तयार होण्यास हजार वर्षे लागतात. रोपटी आणि इतर कृषी वनस्पतींची लागवड करून ८० टक्के मातीची धूप रोखली जाऊ शकते. सुमारे ३३ टक्के मातीची धूप आतापर्यंत जगभरात झाली आहे.

मातीची धूप झाल्याने जलाशयांतील साठवणुकीची क्षमता कमी होते, प्रदूषण होते आणि पाण्याचा दर्जा खराब होतो, तलावांतील सजीवांचा प्रश्न निर्माण होतो आणि मानव तसेच प्राण्यांना पाण्याचा तुटवडा निर्माण होतो. त्यामुळे रस्ते, सार्वजनिक परिवहन, पिक उत्पादनात घट, अन्नसुरक्षा आणि स्थलांतर यांनाही प्रश्न निर्माण होतात.

आफ्रिकन देशांत विस्थापनाचे प्रश्न आहेत तसेच ते मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, छत्तीसगढ, बिहार, झारखंड आणि ओडिशा या राज्यांतही आहेत. मातीची धूप ही भारतासारख्या कृषीप्रधान देशात आर्थिक परिस्थितीवर दीर्घकालीन परिणाम दाखवते.

मातीची धूप होण्याला आळा घालून सजीवांचे संरक्षण करण्यासाठी नागरिक, शेतकरी, सरकारे, शेतीतज्ञ आणि स्वयंसेवी संस्था यांच्या सांघिक कार्याची गरज आहे आणि याशिवाय कृती योजनेच्या परिणामकारक अंमलबजावणीची गरज आहे.

सेंद्रीय शेती, रूपरेषा ठरवणे, खतांचा कमी वापर, पर्यायी आणि वेगळी पिके घेणे यामुळे मातीची धूप होण्याच्या समस्येला आळा घालण्यास सहाय्य् होईल. तसेच, गवत वाढवणे, मुख्य लागवडीदरम्यान अल्पकालीन पिके घेणे यामुळेही सकारात्मक परिणाम मिळतील.

मुख्यतः सरकारांनी शेतकर्यांमध्ये याविषयी जागृती निर्माण करण्याच्या मुद्यावर लक्ष केंद्रित करणे ही गुरूकिल्ली आहे.

Intro:Body:

े्िे्

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.