ETV Bharat / bharat

कोरोना हा भारत अन् पाकिस्तानचा संयुक्त शत्रू - कोरोना संकटात भारत-पाकिस्तान

भारतीय लष्कर आणि पाकिस्तानी सैन्यामध्ये नियंत्रण रेषेजवळ (एलओसी) सुरू असलेले रक्तरंजित युद्ध सुरूच आहे. भारतीय माध्यमांच्या वृत्तानुसार, मार्च महिन्यात ४११ वेळा शस्त्रसंधी उल्लंघन करण्यात आले. हे प्रमाण गेल्या वर्षीच्या याच काळातील आकडेवारीच्या ५० टक्क्यांहूनही अधिक आहे; तर २०१८ च्या आकडेवारीच्या तब्बल दुप्पट आहे.

an article on CFV in time of corona
an article on CFV in time of corona
author img

By

Published : Apr 27, 2020, 2:54 PM IST

कोरोना विषाणूच्या संकटाचा सामना संपूर्ण जग करत आहे. या अनिश्चिततेच्या काळात परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्याचा आपणही प्रयत्न करत आहोत. मात्र, या परिस्थितीचा दक्षिण आशियातील एका भागावर याचा कोणताही परिणाम झालेला दिसत नाही. भारतीय लष्कर आणि पाकिस्तानी सैन्यामध्ये नियंत्रण रेषेजवळ (एलओसी) सुरू असलेले रक्तरंजित युद्ध सुरूच आहे. भारतीय माध्यमांच्या वृत्तानुसार, मार्च महिन्यात ४११ वेळा शस्त्रसंधी उल्लंघन करण्यात आले. हे प्रमाण गेल्या वर्षीच्या याच काळातील आकडेवारीच्या ५० टक्क्यांहूनही अधिक आहे; तर २०१८ च्या आकडेवारीच्या तब्बल दुप्पट आहे.

५ एप्रिलला, केरन सेक्टर येथे घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाच दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. या कारवाईत विशेष दलाच्या पाच जवानांना वीरमरण आले. पाच दिवसांनंतर, पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील दहशतवादी ताल आणि शस्त्रसाठ्यावर तोफखान्याचा हल्ला करण्यात आल्याचे चित्रण (व्हिडीओ) भारतीय लष्कराकडून प्रसिद्ध करण्यात आले. दोन दिवसांनंतर, केरन सेक्टर येथेच पाकिस्तानी सैन्याकडून करण्यात आलेल्या गोळीबारामध्ये तीन भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एका ८ वर्षीय बालाकाचाही समावेश आहे.

या काळात काही उघड प्रश्न निर्माण होत आहेत. प्रचंड व्याप्ती असलेल्या एका संकटाचा भारत व पाकिस्तान हे दोन्ही देश सध्या सामना करत असताना, आपण सीमारेषेवर शांतता पाळू शकत नाही का? एकमेकांविरोधात लढण्यापेक्षा आपण आप लक्ष संयुक्त शत्रुविरोधात लढण्यासाठी केंद्रित करू नये काय? या दोन्ही प्रश्नांचे उत्तर होकारार्थी आहे. मात्र राष्ट्रीय निर्णय हे कायम नैतिकतेचे मापदंड पळून होत नसतात, हे दुदैवी वास्तव आहे.

नियंत्रण रेषेजवळील गोळीबाराचे दोन्ही देशांच्या लष्करी प्रवक्त्यांकडून बऱ्याच वेळा सुलभीकरण केले जाते. दुसऱ्या बाजूकडून करण्यात आलेल्या अचानक गोळीबारास चोख प्रत्युत्तर देण्यात आले, हे अशा वेळी प्रसिद्ध करण्यात येत असलेले नेहमीचे निवेदन आहे. वास्तव हे यापेक्षा निराळे असते. शस्त्रसंधी उल्लंघन हे केवळ जशास तसे अशा स्वरूपाचे नसते; तर यामधून एलओसीजवळ त्यापेक्षा मोठ्या स्वरूपाच्या लष्करी सामर्थ्याचे दर्शन घडविण्यात येते.

२००३ मध्ये करण्यात आलेल्या शस्त्रसंधी कराराचे पालन भारत व पाकिस्तानकडून साधारणत: २०१२ पर्यंत करण्यात आले. २०१३ वर्षाची सुरुवात एलओसीजवळ गस्त घालणारे जवान लान्स नाईक हेमराज यांच्यावर हल्ला करून त्यांच्या शरीराची विटंबना करण्याच्या कृतीमधून झाली. एलओसी जवळ भूसुरुंग आणि 'आयईडी' पेरण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली. ऑगस्ट महिन्यात, पूंछ सेक्टरमध्ये पाकिस्तानच्या सीमा कृती दलाने भारतीय लष्कराच्या घात हल्ला पथकाच्या पाच जवानांना ठार केले.

एकंदर सुरक्षा व्यवस्थेमध्ये घसरण झाल्याने एलओसीजवळ तणावामध्ये प्रचंड वाढ होऊन त्याचा स्फोट झाला. सीमेपलीकडून (क्रॉस बॉर्डर) होणाऱ्या गोळीबारात इतक्या प्रमाणात वाढ झाली की १४ वर्षांत प्रथमच दोन्ही देशांच्या लष्करी संयोजन विभागाच्या महासंचालकांची समोरासमोर बैठक घेण्यास दोन्ही देशांनी मान्यता दर्शविली. परिस्थितीमधील तणाव कमी करण्यासंदर्भात यावेळी करार करण्यात आला असला तरीही त्याचा प्रत्यक्ष कृतीवर फारसा परिणाम झाला नाही आणि २०१४ नंतर शस्त्रसंधी कराराचे उल्लंघन होण्याच्या घटनांत वाढ झाली.

मी २०१३ चे उदाहरण देत आहे कारण, यामधून असे दिसून येते की २००३ च्या कराराचे पालन करण्यासंदर्भातील निव्वळ तोंडी आश्वासन देण्यामधून, मग ते काल्पनिक असले तरीही केवळ त्यामधून सीमारेषेवर शांतता प्रस्थापित होईल, असे मानणे भाबडेपणा ठरेल. या पार्श्वभूमीवर कुठल्याही प्रकारच्या खऱ्याखुऱ्या तोडग्यासाठी प्रथम पाकिस्तानला त्यांच्या देशामधून होणाऱ्या घुसखोरीवर नियंत्रण ठेवावे लागेल. घुसखोरी सुरूच राहिली आणि एलओसीजवळ भारतीय जवान हुतात्मा होत राहिले; तर शांतता नांदणे शक्यच नाही.

यासाठी पाकिस्तानी 'डीप स्टेट'ने काश्मीर संदर्भातील त्यांच्या मनोधारणेत तसेच या भागातील कथित भारतीय वर्चस्वाचा सामना करणारा देश अशी प्रतिमा उभी करण्याच्या कायमस्वरूपी इच्छेमध्ये मोठा बदल घडविणे आवश्यक आहे. असा एक काळ येतो, ज्यावेळी प्रदीर्घ काळापासून जोपासलेल्या आणि तरीही यशस्वी न झालेल्या अशांची जागा वास्ताविकतेने घेणे आवश्यक असते. आशा हे धोरण असू शकत नाही, असे कायमच म्हटले जाते आणि पाकिस्तानी सैन्याने हे मान्य करण्याची वेळ येऊन ठेपली आहे.

जम्मू-काश्मीर संदर्भात भारतीय सरकारने ऑगस्ट २०१९ मध्ये घेतलेल्या निर्णयांमुळे भारत-पाकिस्तान-काश्मीर हा त्रिकोण उद्ध्वस्त झाला आहे. यासंदर्भातील समीकरणामधून पाकिस्तान बाहेर फेकला गेला आहे. कलाम ३७० हे भारतीय राज्यघटनेतील कलम आहे, एखादा द्विपक्षीय मुद्दा नव्हे. यामुळे याविषयीच्या आंतरराष्ट्रीय तक्रारीस अत्यंत कमी प्रमाणात पाठिंबा मिळेल. जागतिक समुदायाने याआधीच यासंदर्भातील भारताच्या भूमिकेस मान्यता दर्शविली आहे.

काश्मीर मुद्द्याच्या सरकारच्या हाताळणीसंदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात येऊ शकतात. मात्र आपला अंतर्गत मुद्दा आहे आणि यामध्ये पाकिस्तानचा काहीही संबंध नाही. जम्मू काश्मीर आणि लदाख येथील लोकांच्या आकांक्षा, ओळख पुसट होण्याची भीती, आर्थिक विकास आणि तरुणांच्या महत्त्वाकांक्षेची पूर्ती या विविध मुद्द्यांना केवळ भारतीय सरकारच न्याय देऊ शकते.

कारगिल युद्धानंतर, पाकिस्तानमध्ये देशाने या धोकादायक मार्गावरून प्रवास करावा का, यासंदर्भात चिंतन झाले. "देशाने आता मर्यादा आणि प्राधान्यासंदर्भात निष्ठूरपणे वास्तववादी व्हावे. प्रथम आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे काश्मीर प्रश्नी आपली असलेली कटिबद्धता ;वा इतर कुठल्याही अन्य विषयापेक्षा पाकिस्तान टिकणे महत्त्वाचे आहे,'' अशी भूमिका ज्येष्ठ राजनैतिक अधिकारी शहीद एम. अमीन यांनी मांडली होती. सध्या कोरोना विषाणुविरोधात सुरु असलेल्या युद्धामधूनही पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा अशा स्वरूपाचा स्वत:चा शोध घेतला जाईल अथवा नाही, हे अद्यापि स्पष्ट व्हावयाचे आहे.

एलओसीवर शांतता ठेवण्याची जबाबदारी पाकिस्तानच्या सैन्यावरच असल्याची मांडणी मी केल्याचे दिसून येत असले; तरी हे सत्यच आहे. भारतीय लष्कर हे सीमारेषेवर आक्रमक आहे; मात्र भारतीय लष्कराकडून केवळ सीमेपलीकडील घुसखोरीवर शासनात्मक कारवाई करण्यात येते. एलओसीवारीला तणाव कमी करणे ही मुख्यत: पाकिस्ताननेच ठरविण्याची बाब आहे. मात्र याचबरोबर, भारताने 'नो टॉक्स' धोरणाचे पुन:परीक्षण करावे आणि पाकिस्तानने चर्चेसंदर्भात प्रामाणिक प्रयत्न केल्यास त्यास सकारात्मक प्रतिसाद द्यावा. कोविड-१९ विरोधात सार्ककडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचे नेतृत्व करताना पंतप्रधान मोदी यांच्याकडून दर्शविण्यात येत असलेले राजनैतिक कौशल्य हीच सध्या काळाची गरज आहे.

जम्मू काश्मीर मधील जनतेसाठी दोन्ही देशांकडून सहानुभूती दर्शविण्यात येते. मात्र या गोळीबारात दोन्ही बाजूंस असलेल्या नागरिकांचे सर्वाधिक नुकसान होते आहे. अशा वेळी, सध्या सुरु असलेल्या मानवतेविरोधातील संकटामध्ये आणखी भर पडू नये, ही भारत व पाकिस्तान या दोन्ही देशांची जबाबदारी आहे. परंतु, अशा प्रकारची कोणतीही विश्वासदर्शक योजना यशस्वी व्हावयाची असेल; तर दोन्ही देशांमध्ये एक विश्वासाची किमान पातळी विकसित करण्यापासून सुरुवात करावी लागेल. असा सेतू बांधताना भूतकाळातील किल्मिषांचा त्याग करावा लागेल.

"आपल्या धारणा हीच जगाकडे पाहण्याची आपली तावदाने असतात. काही काळानंतर हे तावदाने पुसून स्वच्छ करावीत. अन्यथा त्यामधून प्रकाश आत येणार नाही,'' या आयसॅक असिमोव्ह यांनी दिलेल्या सल्ल्याकडे आपणही लक्ष द्यावयास हरकत नाही.

(हा लेख लेफ्टनंट जनरल डी एस हुडा यांनी लिहीला आहे. हुडा यांनी 2016 साली झालेल्या सर्जिकल स्ट्राईकचे नेतृत्व केले होते.)

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.