चंदिगढ - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी आतापर्यंत विराजमान झालेल्या सर्व व्यक्तींचे चित्र असलेल्या कोलाजमध्ये नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचा समावेश करण्यात आला. पंजाबच्या अमृतसरमधील एका चित्रकाराने ही किमया केली आहे. गेल्या २३० वर्षांपासून संवैधानिक पद्धतीने निवडलेल्या सर्व राष्ट्राध्यक्षांची चित्रे यात आहेत. जगज्योत सिंग रुबल असे चित्रकाराचे नाव आहे.
मी जॉर्ज वॉशिंग्टनपासून ते जो बायडेनपर्यंतच्या सर्व राष्ट्राध्यक्षांची चित्रे साकारली आहेत. देशभरातील आर्ट गॅलरींमध्ये हे चित्र ठेवण्यात यावे तसेच व्हाईट हाऊसमध्येही ही चित्र असावे अशी माझी इच्छा आहे, असे जगज्योत रुबल यांनी सांगितले.
मी ट्रम्प यांच्यापर्यंत सर्व चित्रे साकारली होती. काल बायडेन यांचे चित्र साकारले. मी बायडेन यांचे अभिनंदन करतो. मला आशा आहे की बायडेन यांच्या नेतृत्वाखाली भारत-अमेरिका द्विपक्षीय संबंध आणखी सुदृढ होतील, असेही रुबल म्हणाले.
'हे कोलाज ८ बाय ८ फूट असे आहे. हे पूर्ण करण्यासाठी मला ४ महिने लागले. माझ्या नावावर आदीच १० जागतिक विक्रम आहेत, असेही रुबल यांनी सांगितले.