ETV Bharat / bharat

रेल्वे मालगाड्या बंद केल्यामुळे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांचे जे.पी नड्डांना पत्र - मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग मालगाड्या

मालगाड्या बंद केल्याचे गंभीर परिणाम देशात होऊ शकतात. यामुळे केवळ पंजाबच नव्हे तर लडाख आणि काश्मीरमधील सशस्त्र दलांसह संपूर्ण देशासाठी धोकादायक परिणाम होऊ शकतात. राजकीय संघर्ष किंवा आरोप-प्रत्यारोप करण्याची ही वेळ नाही, असे कॅप्टन म्हणाले.

चंदीगड
चंदीगड
author img

By

Published : Nov 1, 2020, 7:49 PM IST

चंदीगड (पंजाब) - मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी रेल्वे मंत्रालयाने राज्यातील मालगाड्या बंद केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांना यासंदर्भात खुले पत्र लिहिले आहे. मालगाड्या न चालवल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. कॅप्टन यांनी नड्डा यांना याबाबत सामूहिक इच्छाशक्ती दाखवण्याचे आवाहन केले.

  • My open letter to @BJP4India President @JPNadda to whom I am writing in a lot of pain over statements of some BJP national & Punjab leaders. Some of them even called our farmers "Naxal Forces”. I hope he will take note & respond like a statesman. (1/3) pic.twitter.com/z6BUAyQB8H

    — Capt.Amarinder Singh (@capt_amarinder) November 1, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मालगाड्या बंद केल्याचे गंभीर परिणाम देशात होऊ शकतात. यामुळे केवळ पंजाबच नव्हे तर लडाख आणि काश्मीरमधील सशस्त्र दलांसह संपूर्ण देशासाठी धोकादायक परिणाम होऊ शकतात. राजकीय संघर्ष किंवा आरोप-प्रत्यारोप करण्याची ही वेळ नाही, असे कॅप्टन म्हणाले.

रेल्वेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करता येणार नाही

मालगाड्या थांबल्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेस धोका निर्माण होईल. हिवाळा सुरू होताच हिमवृष्टीच्या वेळी लडाख आणि काश्मीर खोऱ्यातील रस्ते बंद पडतात. अशा परिस्थितीत तेथे आवश्यक वस्तू वितरित करणे अवघड होत असून याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. केंद्र सरकार किंवा कोणत्याही राजकीय पक्षाला आमची ही धमकी नाही. मात्र, रेल्वेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करता येणार नाही. देशहितासाठी वादग्रस्त प्रश्नावर तोडगा निघाला पाहिजे, असे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पत्रात म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.