नवी दिल्ली - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे ३० जूनला एकदिवसीय काश्मीर दौरा करणार आहेत. श्रीनगर येथे उच्चस्तरीय बैठकीचे अध्यक्षपद भूषवणार आहेत. यावेळी ते काश्मीरमधील सुरक्षेसंदर्भात चर्चा करणार आहेत.
अमित शाह १ जुलैपासून सुरू होणाऱ्या अमरनाथ यात्रेपूर्वी काश्मीरला भेट देणार आहेत. ३० जूनला ते बाबा बर्फानींचे दर्शन घेणार आहेत. यावेळी ते काश्मीरच्या कोणत्याही भागाचा दौरा करणार नाहीत किंवा कोणत्याही अनौपचारिक बैठकीत भाग घेणार नाहीत. शाह सुरक्षा संदर्भातील बैठक झाल्यानंतर लगेच दिल्लीला माघारी येणार आहेत.
अमित शाह यांच्याबरोबर बैठकीला भारतीय सेना, राज्य पोलीस, सीआरपीएफ, राज्य आणि केंद्रातील गुप्तचर यंत्रणातील वरीष्ठ अधिकारी भाग घेणार आहेत. याआधीही अमित शाह यांची काश्मीर दौरा करताना सुरक्षेच्या संदर्भात अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली होती.