ETV Bharat / bharat

'केंद्रीय राखीव पोलीस दल हे जगातील सर्वांत धाडसी सशस्त्र बल' - Directorate General building of CRPF

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आज केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या मुख्यालय भवनाची पायाभरणी  करण्यात आली.

अमित शाह
अमित शाह
author img

By

Published : Dec 29, 2019, 6:51 PM IST

नवी दिल्ली - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आज केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या मुख्यालय भवनाची पायाभरणी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाला संबोधित करताना केंद्रीय राखीव पोलीस दल हे जगातील सर्वांत धाडसी सशस्त्र बल असल्याचे शाह म्हणाले.

गृहमंत्री पदाचा कारभार स्वीकारल्यानंतर मी केंद्रीय पोलीस सुरक्षा दलाला जवळून पाहत आहे. केंद्रीय राखीव पोलीस दल हे जगातील सर्वांत धाडसी सशस्त्रबल आहे. २१ ऑक्टोबर १९५९ रोजी भारतीय पोलीस दलामधील सीआरपीएफ तथा केंद्रीय राखीव पोलीस दलातील १० शूर पोलीस जवानांना देशाच्या सीमेचे रक्षण करताना प्राण गमवावे लागले. अपुऱ्या साधनसामग्रीनिशी अद्ययावत शस्त्रसुविधांनी सुसज्ज असलेल्या बलाढ्य चिनी सैनिकांशी ते लढले होते. तेव्हापासून २१ ऑक्टोबर हा दिवस ‘राष्ट्रीय पोलीस शहीद दिन’ म्हणून पाळला जातो. 80 आणि 90 च्या दशकामध्ये देशामध्ये शेजारी देशांनी दहशतवाद पससरवण्याचा अपयशी प्रयत्न केला. दहशतवाद नष्ट करण्यात सीआरएफने महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली आहे, असे शाह म्हणाले.

हेही वाचा - गुजरातमध्ये मानवी तस्करी रॅकेटचा पर्दाफाश, 125 पेक्षा जास्त मुलांची सुटका

सर्व सुविधायुक्त मुख्यालय सीआरपीएफला मिळाल्यास त्यांच्या सुसज्जता आणि सतर्कतेमध्ये आणखी वाढ होईल. तुम्ही देशाची संरक्षण करा, आम्ही तुमच्या परिवारांची काळजी आणि सुरक्षा आम्ही घेऊ, असे शाह म्हणाले.
हेही वाचा - 'देशातील युवकांना अराजकता आणि अव्यवस्थेविरूद्ध चीड'

जवानांना दरवर्षी किमान 100 दिवस आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवता येईल, असा प्रकारे जवानांची नियुक्ती करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. त्यामुळे जवानांना कौटुंबिक जीवनात सुधारणा करण्यास फायदा होणार आहे, असे शाह म्हणाले.

देशातील कठीण भागात कर्तव्य बजावणे तसेच ईशान्य भारताच्या आव्हानांसह ज्या ज्या ठिकाणी गरज पडली तिथे सीआरपीएफने महत्त्वाचे योगदान दिले आहे. सीआरपीएफने सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका निभावली आहे.

Intro:Body:

'केंद्रीय राखीव पोलीस दल हे जगातील सर्वांत धाडसी  सशस्त्र बल'

नवी दिल्ली - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आज केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या मुख्यालय भवनाची पायाभरणी  करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाला संबोधीत करताना केंद्रीय राखीव पोलीस दल हे जगातील सर्वांत धाडसी  सशस्त्र बल असल्याचे शाह म्हणाले.

गृहमंत्री पदाचा कारभार स्विकारल्यानंतर मी केंद्रीय पोलीस सुरक्षा दलाला जवळून पाहत आहे. केंद्रीय राखीव पोलीस दल हे जगातील सर्वांत धाडसी सशस्त्रबल आहे.  २१ ऑक्टोबर १९५९ रोजी भारतीय पोलीस दलामधील सीआरपीएफ तथा केंद्रीय राखीव पोलीस दलातील १० बहादूर पोलीस जवानांना देशाच्या सीमेचे रक्षण करताना प्राण गमवावे लागले. अपुऱ्या साधनसामग्रीनिशी अद्ययावत शस्त्रसुविधांनी सुसज्ज असलेल्या बलाढय़ चिनी सनिकांशी ते लढले होते. तेव्हापासून २१ ऑक्टोबर  हा दिवस ‘राष्ट्रीय पोलीस शहीद दिन’ म्हणून पाळला जातो. 80 आणि 90 च्या दशकामध्ये देशामध्ये शेजारी देशांनी दहशतवाद पससरवण्याचा अपयशी प्रयत्न केला. दहशतवाद नष्ट करण्यात सीआरएफने महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली आहे, असे शाह म्हणाले.

सर्व सुविधायुक्त मुख्यालय सीआरपीएफला मिळाल्यास त्यांच्या सुसज्जता आणि सतर्कतेमध्ये आणखी वाढ होईल. तुम्ही देशाची सुरक्षा करा, आम्ही तुमच्या परिवारांची काळजी आणि सुरक्षा आम्ही घेऊ, असे शाह म्हणाले.

जवानांना दरवर्षी किमान 100 दिवस आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवता येईल, असा प्रकारे जवानांची नियुक्ती करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. त्यामुळे जवानांना कौटुंबिक जीवनात सुधारणा करण्यास फायदा होणार आहे, असे शाह म्हणाले.

 देशातील कठीण भागात कर्तव्य बजावणे तसेच ईशान्य भारताच्या आव्हानांसह ज्या ज्या ठिकाणी गरज पडली तिथे सीआरपीएफने महत्वाचे योगदान दिले आहे. सीआरपीएफने सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाची भुमिका निभावली आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.