नवी दिल्ली - हिमाचलमध्ये भारतीय जनता पक्षाला 2 वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने गृहमंत्री अमित शाह यांनी शिमलामध्ये एका सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. काँग्रेस विधेयकाविरोधात खोट्या बातम्या पसरवत असून या विधेयकामुळे एखाद्याचे नागरिकत्व जाईल, अशी एक तरी तरतूद राहुल गांधींनी दाखवावी, असे शाह म्हणाले.
-
कांग्रेस एंड कंपनी अफवाह फैला रही है कि नागरिकता संशोधन कानून से अल्पसंख्यक लोगों की नागरिकता जाने वाली है।
— BJP (@BJP4India) December 27, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
मैं यहां से राहुल बाबा को चैलेंज देता हूं कि इस एक्ट में एक भी जगह किसी की भी नागरिकता लेने का प्रावधान है तो दिखाइए: श्री @AmitShah #JAIBJPHP2YEAR
">कांग्रेस एंड कंपनी अफवाह फैला रही है कि नागरिकता संशोधन कानून से अल्पसंख्यक लोगों की नागरिकता जाने वाली है।
— BJP (@BJP4India) December 27, 2019
मैं यहां से राहुल बाबा को चैलेंज देता हूं कि इस एक्ट में एक भी जगह किसी की भी नागरिकता लेने का प्रावधान है तो दिखाइए: श्री @AmitShah #JAIBJPHP2YEARकांग्रेस एंड कंपनी अफवाह फैला रही है कि नागरिकता संशोधन कानून से अल्पसंख्यक लोगों की नागरिकता जाने वाली है।
— BJP (@BJP4India) December 27, 2019
मैं यहां से राहुल बाबा को चैलेंज देता हूं कि इस एक्ट में एक भी जगह किसी की भी नागरिकता लेने का प्रावधान है तो दिखाइए: श्री @AmitShah #JAIBJPHP2YEAR
पाकिस्तानने नेहरू-लियाकत कराराचे पालन नाही केले. त्यांनी अल्पसंख्याक नागरिकांचा छळ केला. त्यामुळे पाकिस्तानमधून लाखो लोक भारतामध्ये आले आहेत. मात्र त्यांना भारतीय नागरिकत्व मिळाले नाही. त्यामुळे या शरणार्थी लोकांना नागरिकत्व देण्यासाठी केंद्र सरकारने नागरिकत्व विधेयक आणले आहे. मात्र काँग्रेस विधेयकाविरोधात खोट्या बातम्या पसरवत आहे, असे शाह म्हणाले.
मी राहुल बाबा यांना आव्हान करतो की, त्यांनी फक्त एक तरतूद दाखवावी ज्याच्यामुळे एखाद्याचे नागरिकत्व हिसकावले जाईल, असे शाह म्हणाले.
काँग्रेस सरकार 10 वर्ष सत्तेमध्ये होती. तेव्हा पाकिस्तानमधून घुसघोर भारतामध्ये घुसत होते आणि ते भारतीय जवानांवर हल्ले करायचे. मात्र देशाचे पंतप्रधान याबाबतीत एकही शब्द उच्चारत नव्हते, अशी टीका शाह यांनी सभेत केली.