ETV Bharat / bharat

दहशतवादी संघटनांवर कारवाई करा, अमेरिकेची पाकिस्तानकडे मागणी

दहशतवाद समूळ नष्ट करण्यासाठी पाकिस्तानने दहशतवादी संघटनांवर कारवाई करावी, अशी मागणी अमेरिकेने पाकिस्तानवर केली होती.

इम्रान खान माईक पोम्पेओ भेट
author img

By

Published : Jul 24, 2019, 10:07 AM IST

वॉशिंग्टन - दहशतवाद समूळ नष्ट करण्यासाठी पाकिस्तानने दहशतवादी संघटनांवर कारवाई करावी. अमेरिका आणि पाकिस्तानमधील संबंध वृद्धिंगत करण्यासाठी दहशतवादाचा नायनाट करणे, हा कळीचा मुद्दा असल्याचे अमेरिकेचे सेक्रेटरी ऑफ स्टेट माईक पोम्पेओ यांनी म्हटले आहे. मंगळवारी त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची भेट घेतली.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. मागील वर्षी अमेरिकेचे सेक्रेटरी ऑफ स्टेट माईक पोम्पेओ यांनी इस्लामाबादमध्ये इम्रान खान यांची भेट घेतली होती. अफगाणिस्तानातील शांततेसाठी आणि दहशतवाद विरोधी मोहिमेसाठी दोन्ही देशांनी एकत्र येवून काम करण्यावर यावेळी पोम्पेओ यांनी भर दिला.

सुरक्षेसंदर्भातील चर्चेसह व्यापार, गुंतवणूक यावरही दोघांमध्ये चर्चा झाली. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी बैठकी दरम्यान उपस्थित होते. याआधी सोमवारी इम्रान खान यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रप्म यांची भेट घेतली.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.