जयपूर - राजस्थानच्या अलवर जिल्ह्यात एका महिलेवर सामूहिक बलात्कार झाला होता. या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी भीम आर्मीने आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात भीम आर्मीचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांनी देखील सहभाग घेतला आहे.
अलवर येथे पतीच्या समोरच एका विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली होती. या घटनेचा व्हिडियो व्हायरल झाला होता. या प्रकरणी बुधवारी भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर यांनी जयपूर बंदचे आवाहन केले होते. हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी चंद्रशेखर आझाद हे स्वत: राजस्थानमध्ये तळ ठोकून थांबले आहेत.
आरोपींना अटक करावी या मागणीसाठी अलवर प्रशासनाला बुधवारी दुपारी १२ वाजण्यापर्यंत वेळ दिला होता. पण प्रशासन यात अपयशी ठरले. त्यामुळे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे भीम आर्मीने सांगितले.