ETV Bharat / bharat

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावरील प्रतिक्रिया

author img

By

Published : Aug 19, 2020, 12:26 PM IST

Updated : Aug 19, 2020, 12:51 PM IST

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआय करणार असल्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयानंतर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Sushant Singh
सुशांतसिंह

नवी दिल्ली - अभिनेत्री रिया चक्रवर्तीने सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात दाखल केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी घेण्यात आली. या प्रकरणाचा तपास सीबीआय करणार असल्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. या प्रकराणातील सर्व पुरावे सीबीआयला देण्याचे आदेश मुंबई पोलिसांना देण्यात आले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयानंतर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला हा निर्णय म्हणजे सुशांतच्या कुटुंबाचे यश आहे. बिहारमध्ये या प्रकरणी दाखल झालेली एफआयआर न्यायालयाने ग्राह्य धरली आहे, अशी प्रतिक्रिया सुशांतच्या कुटुंबीयांचे वकील विकास सिंह यांनी दिली आहे.

  • It is a very important day for #SushantSinghRajput's family and his fans all over the world. Supreme Court accepted all our points, it also held that what Maharashtra Police was doing was in a limited scope: Vikas Singh, lawyer of Sushant Singh Rajput's father pic.twitter.com/hzYpcKZBJG

    — ANI (@ANI) August 19, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणातील सर्व तपास सीबीआय करेल असे सांगतले आहे. या निर्णयावर सुशांतसिंहचे कुटुंबीय समाधानी असून लवकरच न्याय मिळेल अशी त्यांना अपेक्षा आहे, असेही विकास सिंह म्हणाले.

सुशांतच्या आत्महत्येनंतर नेपोटिझमबाबत बोलून अभिनेत्री कंगणा राणावतने या प्रकरणात उडी घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकारणाचा तपास सीबीआयकडे दिल्यानंतर कंगणाने देखील ट्विट करून आपली प्रतिक्रिया दिली आहे. 'मानवता जिंकली', असे ट्विट कंगणाने केले आहे.

  • Humanity wins, congratulations to each one of SSR warriors, first time I felt such strong force of collective consciousness, AMAZING 👏👏👏#CBITakesOver

    — Kangana Ranaut (@KanganaTeam) August 19, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी न्यायालयाच्या निर्णयावर समाधान व्यक्त केले आहे. 'न्यायव्यवस्थेवर विश्वास वाढविणारा निर्णय ! या प्रकरणाच्या हाताळणीबद्दल महाराष्ट्र सरकारने आत्मचिंतन करण्याची गरज. सुशांत सिंग राजपूत प्रकरणी आणि त्यांच्या चाहत्यांना न्याय मिळेल ही अपेक्षा !' असे फडणवीसांनी ट्विट केले आहे.

  • न्यायव्यवस्थेवर विश्वास वाढविणारा निर्णय !
    या प्रकरणाच्या हाताळणीबद्दल महाराष्ट्र सरकारने आत्मचिंतन करण्याची गरज.
    सुशांत सिंग राजपूत प्रकरणी आणि त्यांच्या चाहत्यांना न्याय मिळेल ही अपेक्षा ! #CBI #SupremeCourt

    — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 19, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

बिहारच्या पोलीस महासंचालकांनी देखील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर आनंद व्यक्त केला आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे नागरिकांचा न्याय व्यवस्थेवरील विश्वास आणखी मजबूत होण्यास मदत झाली आहे. आजच्या निर्णयामुळे बिहार पोलिसांचा तपास योग्यच होता हे सिद्ध झाले. ज्या पद्धतीने मुंबई पोलीस वागले ते चुकीचेच होते, असे बिहारचे पोलीस महासंचालक म्हणाले.

  • #WATCH Bihar DGP says, "I'm very happy. SC order has strengthened trust people have in the Court & has assured the nation that justice will be delivered...Today's verdict has proved that Bihar Police was correct. The way Mumbai Police behaved was illegal." #SushantSinghRajput pic.twitter.com/Odq9TXTiGK

सुशांतसिंह प्रकरणाचा तपास आता सीबीआय करेलच. मात्र, मुंबई पोलिसांच्या प्रामाणिकपणावर संशय घेणे म्हणजे षडयंत्र आहे. न्याय आणि सत्यासाठी संघर्ष करणारा हा महाराष्ट्र आहे. आमच्या राज्याची अशा रितीने बदनामी करणे चांगले नाही. आमचे राज्यशासन अगदी योग्य आहे, असे संजय राऊत म्हणाले.

सुशांतसिंहची सहकलाकार अंकिता लोखंडेने देखील ट्विट करून न्यायालयाच्या निकालावर समाधान व्यक्त केले. 'सत्य जिंकले' असे ट्विट अंकिताने केले आहे.

न्यायालयाच्या निकालानंतर सुशांतचे नातेवाईक आणि बिहारचे आमदार असलेले निरज सिंह बबलू यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. न्यायालयाने योग्य निर्णय दिल्याने आम्ही सर्व कुटुंबीय त्यांचे ऋणी आहोत. ज्यांनी-ज्यांनी आम्हाला या लढ्यामध्ये सहकार्य केले त्यांचे ही आभार निरज सिंह यांनी व्यक्त केले.

या प्रकरणातील सत्य आता बाहेर येईल. जे-जे या प्रकरणात अडकलेले आहेत त्या सर्वांचा आता योग्य तपास होईल अशी प्रतिक्रिया लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी दिली.

  • Not only the truth will surface now but those name will also come out who were behind disrupting the investigation in the case. I hope the Court's order has brought relief to #SushantSinghRajput's family: Lok Janshakti Party (LJP) chief Chirag Paswan pic.twitter.com/EjJenkUihy

Last Updated : Aug 19, 2020, 12:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.