नवी दिल्ली - कॉंग्रेस शासित राज्यांचे मुख्यमंत्री आज सोमवारी राहुल गांधीची भेट घेणार आहेत. या नेत्यांकडून राहुल गांधी यांना राजीनामा मागे घेण्याची विनंती करण्यात येणार आहे. याचबरोबर राहुल गांधी यांनी राजीनामा मागे घ्यावा म्हणूण कॉंग्रेसचे कार्येकर्ते पक्षाच्या मुख्य कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत. यापुर्वी काँग्रेसच्या लोकसभेतील 51 खासदारांनी राहुल यांना राजीनामा मागे घेण्याची विनंती केली होती. मात्र राहुल यांनी अध्यक्षपदी राहण्यास नकार दिला होता.
-
Delhi: Congress workers sit on hunger strike outside party Headquarters, urging Rahul Gandhi to take back his resignation from the post of party President. pic.twitter.com/pqlI5ulZnV
— ANI (@ANI) July 1, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Delhi: Congress workers sit on hunger strike outside party Headquarters, urging Rahul Gandhi to take back his resignation from the post of party President. pic.twitter.com/pqlI5ulZnV
— ANI (@ANI) July 1, 2019Delhi: Congress workers sit on hunger strike outside party Headquarters, urging Rahul Gandhi to take back his resignation from the post of party President. pic.twitter.com/pqlI5ulZnV
— ANI (@ANI) July 1, 2019
राहुल गांधी आणि राज्यांचे मुख्यमंत्री यांची आज भेट होणार आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग , छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि पुडुचेरीचे मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी हे सोमवारी बैठकीत उपस्थित असणार आहेत.
'निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर पक्षातील महासचिव, प्रदेशाध्यक्ष किंवा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देण्याचे धाडस दाखवले नाही. हे सर्व दुख:द होते', असे राहुल गांधी यांनी म्हटल्यानंतर अनेक राज्यांच्या नेत्यांनी राजीनामा दिला होता.
दिल्ली प्रदेश काँग्रेस कमिटीने दिल्लीतील सर्व २८० ब्लॉक कमिटींना बर्खास्त केल्याची माहिती शीला दिक्षित यांनी दिली आहे. तर, तेलंगणा प्रदेस काँग्रेस कमिटीच्या अनेक नेत्यांनी राजीनामा दिला आहे. काँग्रेस सचिव वीरेंद्र राठोड, अनिल चौधरी, राजेश धर्मानी आणि वीरेंद्र वशिष्ट यांनी राजीनामा दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत १२० जणांनी सही करत राजीनामा सोपवला आहे. यामध्ये, सचिव, युथ काँग्रेस, महिला काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.
लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर काँग्रेसच्या कार्यकारणीची बैठक झाली होती. त्यामध्ये राहुल गांधींनी अध्यक्षपद सोडणार असल्याचं म्हटलं होतं. त्यावर तुम्हाला पर्याय असू शकत नाही, असं मत व्यक्त करत उपस्थित पदाधिकाऱ्यांनी राहुल यांचा राजीनामा फेटाळून लावला होता.