नवी दिल्ली - अलका लांबा आणि आम आदमी पक्षात मागील 5 महिन्यांपासून मतभेद सुरू आहेत. त्यामुळे अलका लांबा यांनी आम आदमी पार्टीपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी एक ट्विट करून ही माहिती दिली आहे.
या ट्विटनंतर अलका लांबा यांनी अनेक ट्विट्स केली आहेत. त्यामधील एका ट्विटमध्ये त्यांनी संजय सिंह यांना आपचा संयोजक बनवण्याची मागणी केली आहे. मी आता पक्षामध्ये नाही, त्यामुळे पक्षाबाहेरून एक शुभचिंतक म्हणून हा सल्ला देत आहे. जर दिल्ली जिंकायची असेल तर अरविंद केजरीवालांना दिल्लीवर फोकस करायला पाहिजे, असे त्यांनी आपल्या ट्विटमधून आपला सांगितले आहे.
त्यानंतर अलका यांनी आणखी एक ट्विट केले आहे. त्यामध्ये त्यांनी दिल्लीत 12 मे रोजी मतदान होणार होते. परंतु मतदानाच्या काही दिवसांपूर्वी आमदार पाहिजे तसा प्रचार करु शकले नाहीत. कारण, लोकांनी त्यांना पाणी प्रश्नाच्या मुद्द्यावरून घेरले होते. तर जलमंत्री मुख्यमंत्रीजवळ आहेत. मात्र, त्यांच्याजवळ वेळ नाही. त्यामुळे आमदारांनी हरण्याचे हे एक कारण सांगितले आहे, असे अलका यांनी ट्विट केले आहे.