ETV Bharat / bharat

तवांग सेक्टरमधील सीमेवर आयटीबीपी जवान हाय अलर्टवर

सीमवेर कडाक्याची थंडी पडली आहे. हाडं गोठवणाऱ्या या थंडीचा सामना करत तवांगमध्ये इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलीस दलातील जवान हाय अलर्टवर आहेत. मागील चार महिन्यांपासून चीनकडून सीमेवर आक्रमक धोरण स्वीकारण्यात आले आहे. चर्चेतून काही तोडगा काढण्यासही चीन तयार नाही.

आयटीबीपी
आयटीबीपी
author img

By

Published : Dec 26, 2020, 1:12 PM IST

तवांग - सध्या भारत आणि चीनदरम्यान गेल्या काही महिन्यांपासून तणाव सुरू आहे. तणाव निवळण्यासाठी दोन्ही देशांमध्ये सैन्य पातळीवर चर्चा सुरू आहे. मात्र, चीनच्या आडमुठ्या भूमिकेमुळे चर्चेत अडचणी येत आहेत. अरुणाचलच्या तवांगमध्ये इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलीस दलातील जवान (आयटीबीपी) तैनात असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

आयटीबीपी जवान हाय अलर्टवर

सीमवेर कडाक्याची थंडी पडली आहे. हाडं गोठवणाऱ्या या थंडीचा सामना करत जवान हाय अलर्टवर आहेत. आम्ही देशाचे संरक्षण करण्याची वचनबद्धता दर्शविली आहे. त्यानुसार कर्तव्य पार पाडत असून कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्याची आमची तयारी आहे, असे आयटीबीपीच्या 55 बटालियनचे कमांडंर आय.बी.झा यांनी म्हटलं.

पूर्व लडाख आणि अरुणाचल प्रदेशमधील सीमेवर दोन्ही देशांदरम्यान असलेल्या संघर्षात आयटीबीपीने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. गेल्या एप्रिल-मेमध्ये आयटीबीपीच्या जवानांनी चीनच्या सैनिकांशी लढताना मोठे शौर्य दाखवले. त्यामुळे अरुणाचलमध्ये तैनात असलेल्या सैन्याला यापासून प्रेरणा मिळाली आहे, असेही झा म्हणाले.

आयटीबीपीच्या 55 बटालियनचे कमांडंर आय.बी.झा

सीमेवर जवानांना सतर्कतेचा इशारा -

मागील चार महिन्यांपासून चीनकडून सीमेवर आक्रमक धोरण स्वीकारण्यात आले आहे. चर्चेतून काही तोडगा काढण्यासही चीन तयार नाही. गलवान खोऱ्यातील फिंगर ४ ते ८ या भागात चीन कब्जा करून बसला आहे. मात्र, नुकतेच भारतानेही सीमेवरील काही महत्त्वाच्या ठिकाणांवर सैन्य तैनात केले असून त्यामुळे भारतीय लष्कराला फायदा होत आहे. चर्चेतही भारताचं वजन यामुळे वाढणार आहे. उत्तराखंड, अरुणाचल प्रदेश, हिमाचल प्रदेश, लडाख, सिक्कीम येथील भारत चीन सीमेवर जवानांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

हेही वाचा - ..तर खुल्या चर्चेला तयार व्हा; कृषी कायद्यावरून राहुल गांधी आणि डीएमकेला जावडेकरांचे आव्हान

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.