नवी दिल्ली - भारतीय हवाई दल प्रमुखपदी राकेशकुमार सिंग भादुरिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हवाई दल प्रमुख पदावरून बीएस धनोआ निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागी राकेशकुमार यांची नियुक्ती करण्यात आली. पदभार सुपूर्द करण्याअगोदर धनोआ यांनी नॅशनल वॉर मेमोरियलला भेट देऊन श्रद्धांजली अर्पित केली.
एअर मार्शल राकेश कुमार ३० सप्टेंबरला निवृत्त होणार होते. मात्र, त्यांची आता हवाई दल प्रमुख पदी निवड करण्यात आली आहे. ते या पदावर दोन वर्ष राहण्याची शक्यता आहे.
जून १९८० मध्ये हवाई दलात दाखल
राकेशकुमार जून १९८० मध्ये हवाई दलात सामील झाले होते. त्यांनी त्यावेळी आईएएफच्या फाइटर स्ट्रीममध्ये कमीशन पद मिळवले होते. त्यानंतर हवाई दलातील विविध महत्त्वाची पदे त्यांनी सांभाळली आहेत.
राकेशकुमार यांनी १२ जुलैला फ्रान्समध्ये राफेल लढाऊ विमानाची चाचणी घेण्यासाठी त्यातून उड्डाण केले होते. त्यानंतर त्यांनी राफेल विमानाची पाहणीही केली होती. त्यावर राफेल भारतीय लष्करासाठी खूपच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले होते.